कोल्हापुरात सोमवारी स्वामी भक्तांचा महामेळावा
schedule22 Jul 23 person by visibility 602 categoryलाइफस्टाइल
भक्तीमार्गातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती
अक्कलकोटवरून येणार स्वामींच्या पादुका
कोल्हापूर : दि. २२ : येथील श्री क्षेत्र अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रा व समर्थ फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील स्वामी भक्तांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. दत्त मंगल कार्यालय, फुलेवाडी-रंकाळा रोड, कोल्हापूर याठिकाणी सोमवार २४ जुलै रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत हा महामेळावा होत आहे. नामस्मरण, स्वामींचे दर्शन, ब्रम्हांडनायक चित्रपट् व्याख्यान, स्वामीरत्न सन्मान, भक्तीगंध-भावगीते आणि महाप्रसाद असे सोहळ्याचे स्वरुप आहे. स्वामींच्या कृपेने होणाऱ्या या भव्यदिव्य शाही सोहळ्यात स्वामींच्या लीलांचा आविष्कार ऐकण्यासाठी स्वामी भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन फौंडेशनचे अध्यक्ष सुहास पाटील, यशवंत पाटील, स्वामी भक्त रमेश चावरे, यशवंत चव्हाण, कुलदीप जाधव, विनाताई रेळेकर, वेनूताई सुतार यांनी केले आहे.
या गौरवशाली मेळाव्यास प्रमुख पाहुणे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्टचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, चोळाप्पा महाराजांचे पाचवे वंशज श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे प. पू. श्री. पंडित विद्याकर गुरुजी, श्री नृसिंह स्वामी समर्थ ज्ञानमठ देवठाणेचे श्री. स. स. श्रीकृष्णजी-देवा, पुणे येथील ज्येष्ठ स्वामी अभ्यासिका-व्याख्यात्या विजयालक्ष्मी शिरगांवकर, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते नितीन वाडीकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज प्रशांतमहाराज मोरे, स्वागताअध्यक्ष माजी परिवहन सभापती व सामाजिक कार्यकर्त्या प्रतिज्ञा महेश उत्तुरे, चंदगड येथील दौलत कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांचेसह सचिन ज्वेलर्स कागलच्या अश्विनी सचिन मुरतले, श्री, शाहु छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे, साखर उद्योजक राजकुमार देसाई, ब्रम्हांडनायक चित्रपटाचे निर्माते मनोज साळुंखे, कोल्हापूर ते अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रा अध्यक्ष अमोल कोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महासोहळ्यामध्ये अक्कलकोट समाधी मठातील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्य वापरातील पादुकांचे आगमन व दर्शनासाठी ठेवल्या जाणार आहेत. सर्व भक्तांसाठी व प्रत्येक भक्तांच्या कुटूंबामध्ये सुख-समृद्धी जीवनामध्ये असावी यासाठी हा सोहळा होत आहे. स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून सेवेचा व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक स्वामी भक्तांच्यावतीने केले आहे.