
कोल्हापूर
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय विलेपार्ले शाखेच्या वतीने दिला जाणारा मराठी वाडःमय पुरस्कार शिराळा तालुक्यातील पावलेवाडीचे साहित्यिक श्री विष्णू पावले यांच्या पुस्तकाला जाहीर करण्यात आला आहे . यंदाचा वाडःमयाचा पुरस्कार 'पधारो म्हारो देस' या पुस्तकाला प्रदान करण्यात आला आहे.या पुस्तकामध्ये राजस्थानमधील भौगोलिक ,भिन्न भाषिक ,ऐतिहासिकदृष्या राजस्थानची माहितीचे चित्र रेखाटले आहे . हा कार्यक्रम मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय विलेपार्ले शाखेच्या वर्धापणदिनी गुरुवार दिनांक २ मार्च २०२३ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता संपन्न होणार आहे .