+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule06 Apr 23 person by visibility 918 categoryशैक्षणिकशैक्षणिक

कोल्हापूर : आवाज इंडिया


मार्च - 2019 , 2020 , 2021 व 2022 मधील विशेष गुणवत्ता प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व वर्ष 2023 च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ असा संयुक्त कार्यक्रम 26 मार्च ,2023 रोजी ज्ञानदीप सांस्कृतिक हॉल , कसबा बावडा येथे संपन्न झाला . मा अशोक जाधव सर , माजी शिक्षण सभापती , कोल्हापूर महानगरपालिका हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर मा श्री अजितदादा पवार धामोडकर , माजी परिवहन समिती , को म न पा , मा सौ ए एस नवाळे मॅडम ,मुख्याध्यापिका , भाई माधवराव बागल प्रशाला, मा श्री जे जे पाटील सर , मुख्याध्यापक , जीवन कल्याण हायस्कूल , कसबा बावडा , कोल्हापूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
    प्रा बसवंत पाटील संस्थापक अध्यक्ष , गौराई फौंडेशन कोल्हापूर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व गेल्या १९ वर्षातील क्लासच्या दैदिप्यमान यशाचा आढावा घेतला .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा अजितदादा पवार-धामोडकर , मा जे जे पाटील सर , मा सौ नवाळे मॅडम यांनी गुणवंत विद्यार्थ्याचे अभिनंदन केले व सरत्या वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप देताना करियर मार्गदर्शन केले . अध्यक्षस्थाना वरून बोलताना मा अशोक जाधव सर म्हणाले , " प्रा पाटील हे अनेक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले ते उत्तम प्रशासक म्हणून काम ही पाहू शकले असते . IAS सारखी परीक्षा उत्तीर्ण होऊन सुद्धा त्यांची अंतिम निवड होऊ शकली नाही . त्यांनी 19वर्षांपूर्वी लावलेल्या गौतमीज यश क्लासेस रुपी रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर होताना पाहून विषेश आनंद होतो . आम्हा बावडेकरांचे नशीब थोर म्हणून इतक्या समर्पित भावनेने विद्यार्थ्यांमध्ये समरस होऊन शिकवणारा प्रामाणिक , समाजातील गोर गरीब विद्यार्थ्याप्रती तळमळ असलेला आणि व्यवसायिक क्षेत्रात असून सुध्दा सामाजिक भान जपणारा अवलिया आमच्या पाल्याना शिक्षक म्हणून लाभला ." या वेळी गौतमी बसवंत पाटील (94% , मार्च -2019) , सेजल शिवाजी नेसरकर(निट्टूर ,ता चंदगड ) (96.60 % , मार्च 2020) , तेजोमय ठोंबरे (96.90 , मार्च - 2021) , श्रुती पाटील (95.00 ,मार्च 2022 ) या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला . यासह ८० विद्यार्थ्यांनी सत्कार स्विकारला . या प्रसंगी मा सौ भारती बसवंत पाटील , उपाध्यक्ष , गौराई फौंडेशन , कोल्हापूर ,मा श्री रामचंद्र उमाना पाटील , सदस्य , गौराई फौंडेशन , कोल्हापूर यांच्या सह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. डॉ विठ्ठल पाटील यांनी पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार मानले .