नरेंद्र मोदी, अमित शहा, फडणवीस, एकनाथ कोल्हापुरात महायुतीवर बंटी पाटलाने केली मात
schedule04 Jun 24 person by visibility 192 categoryराजकीय
कोल्हापूर ; प्रशांत चूयेकर
कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले तरी या सर्वांच्याआले तरी या सर्वांच्यावर मात माझी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केली.
आ.सतेज पाटील यांनी कोल्हापुर, हातकणंगले या दोन्ही ठिकाणी कडक यंत्रणा राबवली.शाहू छत्रपती उमेदवार असले तरी अजिंक्यतारावर सर्व सूत्रे घेत संपूर्ण मतदारसंघावर नजर टाकली.महापौर, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्यस, सरपंच विविध सहकारी संचालक यांच्यासह सर्व क्षेत्रातील कार्यकर्त्यांना एकत्र घेत मतदारांचा विश्वास संपादन केला.हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सुद्धा त्यांनी अनेक जाहीर सभा घेतल्य.
आमदार ऋतुराज पाटील आमदार जयश्री जाधव
स्वतःसतेज पाटील यांनी प्रत्येक सभेला हजेरी दाखवत विरोधकांना अंगावर घेण्याचे धाडस दाखवलं.केंद्र शासनापासून ते कोल्हापूरचा खासदार कसा जनतेकडे दुर्लक्ष करतो याची उदाहरण देऊन मतदारांना पटवून दिले.
सभेच्या ठिकाणापासून ते बूथ पर्यंत आपले कार्यकर्ते कसे उपस्थित राहतील, मतदारांना मतदान स्लिप पोहोचण्याचे काम करतील याकडे पाटील यांनी बारकाईने लक्ष दिले.कुठे मतदान कमी पडणार त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या त्यांना विश्वासात घेतले.मतदार संघातील बडे नेते ए.वाय पाटील, अपी पाटील अजित तायशेट्टी, आदी मतदारसंघातील प्रमुख नेत्यांना एकत्र करत विजयाची मोट बांधणी.
मतदानापासून मतमोजणी पर्यंत अजिंक्यतारा ची सर्व यंत्रणा कार्यरत होती.गतवेळच्या निवडणुकीचा अंदाज असल्याकारणाने यावेळची निवडणुकीत विजय मिळवणे बंटी पाटील यांना सोपे गेले.त्यामुळेच शाहू छत्रपती यांच्या विजयाचे श्रेय आमदार बंटी पाटील यांना दिले तर ते चुकीचे ठरणार नाही.
आमदार पी. एन.पाटील,आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव,आमदार जयवंत आसगावकर, आमदार राजूू आवळे यांच्यासह माजी आमदार यांना सोबत घेत त्यांनी प्रचाराची एक हाती सूत्रे सांभाळली.