बालकांसाठी काम करणाऱ्या संस्था घेणार मनपा प्रशासकांची भेट
schedule05 Jun 23 person by visibility 147 category
कोल्हापूर : लहान मुलांना आपल्या दारात खेळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. लहान बालकांचा हा हक्क आहे. मुलांना शिवीगाळ करुन हाकलून देणाऱ्या व्यक्तिच्या विरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी कोल्हापूर-राधानगरी रोडवरील जिवबा नाना जाधव पार्कातील पालकांनी बालकांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या `चाइल्ड लाइन` या संस्थेसह बालकांसाठी काम करणाऱ्या संस्थाकडे धाव घेतली आहे. संबधितांवर कारवाईसाठी संस्था कोल्हापूर महानगरापालिका प्रशासकांना निवेदन देणार आहे.
लहान मुलांचे खेळणे हे एक भावविश्व आहे. त्यांच्या खेळण्याला कोणी विरोध करु शकत नाही. उपनगरातील काही भागात महापालिकेची मैदाने नसल्याने मुले स्वत:च्या दारात खेळ करतात. मात्र काही व्यक्तिकडून त्यांच्या खेळण्याला विरोध होत आहे. काही व्यक्ति त्यांना शिवीगाळ करून हाकलून देतात. त्यांच्या खेळण्याला विरोध करतात. अशा प्रवृत्तीला विरोध करण्यासाठी पालकांनी बालकांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थाकडे धाव घेतली आहे. या संस्था संबधित घटनेची माहिती घेऊन महापालिकेच्या प्रशासकांची भेट घेणार आहे. संबधित प्रकाराची निवेदनाची प्रत जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाला देणार असल्याचे पालकांनी सांगितले.