+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustतांत्रिक वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी कापूस प्रक्रिया क्षमता ३० वरून ८०टक्के पर्यत वाढविण्याचे उद्दिष्ट* - *वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील* adjustदेशातील आघाडीच्या १५० संस्थामध्ये* *डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ* adjustचाइल्डलाइन संस्थेने केली `त्या` संबधितांची कानउघाडणी adjustराजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार बसवंत पाटील यांना जाहीर* adjustभारत राष्ट्र समिती पक्ष* adjustनग्न पूजेची आणिबाणी; महिलांनी सोडले नोकरीवर पाणी adjustशिवसेनेच्या वतीने “राज्याभिषेक सोहळा” उत्साहात संपन्न* adjust50 वर्षे शिवराज्यभिषेकदिन सोहळा साजरा करण्याची परंपरा प्रेरणादायी : मालोजीराजे छत्रपती adjustआपली आवड व कौशल्य ओळखून विद्यार्थ्यांनी करिअर निवडावे- डॉ महादेव नरके* adjustबालकांसाठी काम करणाऱ्या संस्था घेणार मनपा प्रशासकांची भेट
schedule18 Mar 23 person by visibility 195 categoryराजकीय

कोल्हापूर: राजाराम कारखाना कार्यक्षेत्रातील चोकाकसह हुपरी, इंगळी तसेच वंदूर, करनूर, लिंगनूर परिसरातील सभासदांची माजी आमदार अमल महाडिक यांनी भेट घेतली. यावेळी सर्व सभासदांनी राजाराम कारखान्याच्या पारदर्शी कारभाराबाबत समाधान व्यक्त केले. 

यावेळी अमल महाडिक यांनी शेतकरी केंद्रबिंदू मानून कारखान्याचा कारभार सुरू असल्याचे नमूद केले. तसेच "ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कारखाना प्रशासनाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. ऊस बियाणे- रोपवाटप तसेच माती परीक्षण केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सल्ला आणि मार्गदर्शन करत उत्पादन वाढीसाठी आम्ही प्रयत्न केले. महापूर काळात पूर बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या ऊसाला प्राधान्य देऊन उचल केली. त्प्रत्येक संकटामध्ये सभासदांसोबत आम्ही उभे राहिलो. त्यामुळेच आज सत्तारूढ सहकार आघाडीबाबत सर्वत्र सकारात्मकता जाणवते आहे. आणि हीच सकारात्मकता शेवटी विजयापर्यंत घेऊन जाईल." असा विश्वास अमल महाडिक यांनी व्यक्त केला. 

" केवळ सूडबुद्धीने अपप्रचार करायचा आणि स्वार्थ साधायचा हीच विरोधकांची निती आहे. राजारामच्या कारभारावर बोलण्यासारखे काहीही नसल्यामुळे विरोधक बेताल वक्तव्य करत सुटले आहेत." असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित सभासद शेतकऱ्यांनी सत्तारूढ सहकार आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा पुनरुच्चार केला. 

 यावेळी मा.संचालक आनंदा तोडकर, वडगाव मार्केट कमिटी सदस्य धुळाप्पा डवरे, शिवसिंह घाडगे , महावीर पाटील, देवाप्पा मुधाळे,संजय मगदूम,अविनाश बनगे, कृष्णा निकम, नंदकुमार पाटील, दिनकर ससे, सुभाष माळी, संभाजी निकम, शांताराम देसाई,अनंत बल्लोळे, किरण पोतदार, संभाजी पाटील, श्रीमंधर चौगुले, रावसाहेब पाटील, जिनेंद्र ऐतवडे, शांतीनाथ देसाई, रामू पाटील,तानाजी बागणे, कोंडीबा लोकरे यांच्यासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते