Awaj India
Register
Breaking : bolt
*डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांची* *तैवान एक्स्पिरियन्स एज्युकेशन प्रोग्रामसाठी निवड*गोकुळ दूध वितरक कमिशन वाढीच्या निर्णयाला विरोध;गांधीनगरात सिंधी समाजाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर*सहकार उपनिबंधकांकडून अवसायनातील २९८ दूध संस्थाही गोकुळच्या मतदानास पात्रकोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालयाजवळ लवकरच 'गोकुळ शॉप' होणार सुरू;उपवर्गीकरण ला विरोधच: डॉक्टर राजेंद्र गवई यशवंतराव चव्हाण (के. एम. सी) काॅलेज मध्ये आविष्कार संशोधन प्रकल्प कार्यशाळा संपन्न डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या डेटा सायन्स विभागाला आघाडीच्या कंपन्यांची पसंती*सर्किट बेंचने अवसायनातील दूध संस्था केल्या पात्र*पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे कार्य* *सामान्य माणसाला दिलासा देणारे

जाहिरात

 

राजारामपुरीत साकारणार महाराष्ट्राची लोकसंस्कृती

schedule27 Aug 25 person by visibility 1284 categoryउद्योग

राजारामपुरीत साकारणार महाराष्ट्राची लोकसंस्कृती 
 
राजारामपुरी येथील सहाव्या गल्लीतील तांत्रिक देखाव्यासाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या राजारामपुरी जय शिवराय तरुण मंडळ यांनी यंदाही आपले वेगळेपण जपत महाराष्ट्राची लोकसंस्कृती: वासुदेव हा हलता भव्य तांत्रिक देखावा साकार केला आहे गेले आठ दिवस सदर देखावा जोडण्याचे काम अहोरात्र सुरू आहे महाराष्ट्राला समृद्ध लोककलांचा वारसा लाभला आहे. पन्नास साठ वर्षांपूर्वीच्या गावगाड्‌यात लोककलावंतांना आदराचं आणि मानाचं स्थान होते. खेड्याची सकाळ या लोककलावंतांच्या आगमनाने प्रसन्न व्हायची.मंडाळाने यंदा मंडपातच खेडेगाव बसवले आहे जुन्या काळातील खेडेगावातील घरे हुबेहुब बनवली आहेत यामध्ये काही घरे दुमजली देखील आहेत.भल्या पहाटे उठून महिला जात्यावर दळण दळत आहेत. त्यांच्या भावस्पर्शी ओवीनं कुटुंबातील लहान मुलं डोळे चोळत आईच्या मांडीवर येऊन बसायची. शेतकरी राजाची जनावरांना चारापाणी घालून शेतावर जाण्याची लगबग सुरू आहे. महिला आपल्या घराच्या दारात अंगणात स्वच्छता करत
 आहेत. दुसरी महिला आपले धान्य पाकडत आहे.त्याच वेळी 
दारात टिल्लम टिल्लम टाळ वाजवीत वासुदेवाची स्वारी हजर होते, डोक्याला मोरपिसांची टोपी, घोळदार अंगरखा, काखेत झोळी, कमरेला शेला, त्यामध्ये खोवलेली बासरी, कपाळाला व कानाला टिळा, गळ्यात कवड्याची माळ, पायात घुंगराचे चाळ, हातात चिपळ्या आणि टाळ अशा वेशातला वासुदेव गावात येतो महिला त्याला घरातील धान्य दान स्वरूपाचा देतात वासुदेव तीस फूट फिरत गावातील प्रत्येकाच्या दारात जातो. दुसऱ्या बाजूला एक महिला सकाळी आपल्या तुळशी वृंदावनाची पूजा करून आपल्या दिवसाची सुरुवात करताना दिसून येते तर दुसऱ्या एका घराच्या अंगणामध्ये दोन महिला उखळामध्ये मुसळाच्या साह्याने धान्य सडताना दाखवले आहेत. बरोबर शेतकऱ्याचे असणारे पशुधन गाय बकरी कोंबड्या बैल अगदी हुबेहूब उभे केले आहेत व सर्व मुर्त्या हलत्या आहेत काही घरांवर माकडे बसलेले आहेत. देखावा पाहताना आपल्यासमोर आपण त्या गावातच येऊन उभे आहोत असा भास होत आहे.साडेतीन मिनिटांचा असून बहुतांशी हालचाली इलेक्टीक मोटर पंपवर होणार असून आत्ता पासून गल्लीमध्ये देखाव्याचे जोड काम पाहण्यास गर्दी होत आहे लहान मुलांपासून वयोवृध्दापर्यंत देखाव्याचे आकर्षण असणार आहे यंदाच्या वर्षी आज पर्यतचे सर्व गर्दीचे उच्चांक मोडला जाईल असे मंडळाचे कार्यवाहक धनराज माने,कार्याध्यक्ष विनित कागले अध्यक्ष तेजस जगताप उपाध्यक्ष मीत कागले सचिव धनंजय गाडगीळ यांनी सांगितले आजपर्यंत राजारामपुरी जय शिवराय तरुण मंडळाने विविध सामाजिक प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे देखावे सादर केले आहेत याबद्दल विविध पुरस्काराने म्हणाला गौरवण्यात आले आहेत.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes