+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule21 Dec 22 person by visibility 227 categoryशैक्षणिकशैक्षणिक
कोल्हापूर 
अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी बुधवारी डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा बावडाच्या विद्यार्थ्यांशी आपल्या आगामी ‘वेड’ या चित्रपटातील गाण्यावर ठेका धरत संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनीही जल्लोष करत त्यांच्यासोबत सेल्फी काढल्या. या जोडीने आपल्या संवाद व नृत्यातून डी. वाय. पाटील ग्रुपच्या विद्यार्थ्याना अक्षरशः ‘वेड’लावले.
    रितेश देशमुख दिग्दर्शित करीत असलेल्या व त्याची पत्नी जेनेलिया निर्माती असलेला ‘वेड’ हा मराठी चित्रपट 30 डिसेंबर पासून प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे संगीत अजय- अतुल यांचे आहे. जेनिलियाचा पहिलाच मराठी चित्रपट असून याचे प्रमोशन करण्यासाठी अभिनेता रितेश व जेनेलिया यांनी बुधवारी डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पॉलिटेक्निक. मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
   रितेश व जेनेलिया यांचे आगमन होताच विद्यार्थ्यांनी टाळ्या, शिट्ट्याच्या गजरात जल्लोष केला. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त तेजस सतेज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे,प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सिएचआरओ श्रीलेखा साटम, डॉ. लीतेश मालदे, डॉ. राजेंद्र रायकर यांच्यासह विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व तीन हजाराहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
   या चित्रपटातील सलमान खानवर चित्रित केलेले गाणे सुरू होताच ‘भाऊ, खाली येऊन आमच्यासोबत नाचा की...’ अशी विद्यार्थ्यांनी विनंती करताच रीतेश यांनी स्टेजवरून खाली येत विद्यार्थ्यासोबत ठेका धरला. त्यानंतर जेनेलीयालाही खाली बोलावून या दोघांनी विद्यार्थ्यांसोबत नृत्य केले. चित्रपटातील दुसरे गाणे सुरू होताच सुत्रचसंचालन करणारी विद्यार्थिनी जुही धारवाडे हिच्यासोबत रितेशने स्टेजवर नृत्य करताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला . यानंतर रितेश आणि जेनेलिया या दोघांनी या रोमँटिक गाण्यावर अतिशय सुंदर नृत्य करत विद्यार्थ्यांची मने जिंकली. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत फोटो व सेल्फी घेतले.  
    ‘वेड’ या चित्रपटात एकतर्फी प्रेमाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. नेहमी आपल्या विनोदाने हसवणारा रितेश यात गंभीर भूमिकेत दिसत आहे. ज्या व्यक्तीवर प्रेम असते त्या व्यक्तीबरोबर लग्न न झालेल्या तरुणाची भूमिका रितेशने साकारली आहे. दुसरीकडे जिनिलीयाने साकारलेले पात्र हे रितेशवर जीवापाड प्रेम करत आहे. प्रेमासाठी या दोघांची होणारी फरफट दाखवण्यात आली आहे. प्रत्येकानेच महाविद्यालयीन जीवनात प्रेमाचा अनुभव घेतलेला असतो, तसेच प्रेमात ‘वेड’ ही असतेच. त्यामुळे या कथानकाचा शेवट कसा होतो हे पाहण्यासाठी हा चित्रपट नक्की पहा असे आवाहन, रितेश व जेनेलिया यांनी यावेळी केले.


*डी. वाय. पाटील ग्रुप 'लय भारी'*
डी. वाय. पाटील ग्रुप 'लय भारी'... येथील शिक्षण म्हणजे 'नाद खुळा'.... अशा शब्दात अभिनेता रितेश देशमुख यांनी डी वाय पाटील ग्रुपबद्दल गौरवोद्गार काढले. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील आणि संपूर्ण पाटील कुटुंबियांशी आपले घरचे नाते आहे. कोल्हापुरात यायला मला नेहमीच आवडते, असे रितेश देशमुख यांनी यावेळी सांगितले.