+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustलेझर शोमुळे तरुणाच्या डोळ्याला रक्तस्राव adjustराजारामपुरी होणार स्त्री शक्तीचा जागर* adjustयशवंतराव चव्हाण(के.एम.सी.) काॅलेज मध्ये "आपत्ती व्यवस्थापन" भित्तीपत्रकाचे आयोजन adjustपत्नीची विचारपूसही न करणाऱ्या पतीला दणका दरमहा 10 हजार रुपये पोटगी देण्याचे न्यायालयाचे आदेश adjustनिगवे खालसा येथील श्री नृसिंह सरस्वती मंदिरास २ कोटींचा निधी; मा.आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्यास यश* adjustविद्यार्थांनी भविष्यात नाविन्यपूर्ण क्षेत्रामध्ये करिअर करावे adjust*डी वाय पाटील अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्यांची* *‘इस्रो’ सेंटरमध्ये इंटर्नशिपसाठी निवड* adjustमुहम्मद असिफ खलील मुजावर यांना ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार adjustशरद गायकवाड यांना 'क्रांतीबा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक' पुरस्कार adjustकोल्हापूरला खड्डेपुर करणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात ८१ प्रभागांमध्ये आंदोलन
schedule21 Mar 23 person by visibility 133 category

तळसंदे/ वार्ताहर
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदेच्या अधिव्याख्याता प्रा. अश्विनी चौगुले यांना आविष्कार फौडेशनच्यावतीने राज्यस्तरीय ‘राजमाता जिजाऊ पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. सोलापूर वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त दीपक आर्वे यांच्याहस्ते प्रा. चौगुले यांना गौरविण्यात आले.
 
   पत्रकार संजय पवार यानी ‘आविष्कार फौडेशन’ची स्थापना २००७ मध्ये कोल्हापूर येथे केली. ही संस्था गेली १५ वर्षे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेच्या सोलापूर जिल्हा शाखेच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय " राजमाता जिजाऊ पुरस्कार’’ वितरण सोहळा १९ मार्च आयोजीत करण्यात आला आहे. प्रा. चौगुले यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली. 

प्रा. अश्विनी चौगुले या तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठामध्ये कॉम्प्युटर सायन्स अंड इंजिनिअरिंग विभागात अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी गोखले कॉलेज व शाहू कॉलजमध्ये १४ वर्षे त्यांनी अध्यापन कार्य केले आहे. या दरम्यान अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या अनेक विद्यार्थीनीना स्वखर्चातून गणवेश व शालेय साहित्य त्यांनी उपलब्ध करून दिले. तसेच शेकडो मुलीच्या मोफत शिकवण्याही त्या घेतात. मुलीना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना पाठबळ देण्यासाठी त्या सतत कार्यरत आहेत. 

   रविवार दिनांक १९ मार्च रोजी सोलापूरमधील मुरारजी पेठ येथील अॅम्फी थिएटर हिराचंद नेमचंद वाचनालयात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. सोलापूर वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त दीपक आर्वे, सोलापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, स्मार्ट अकेडमीचे संस्थापक व पत्रकार सचिन वायकुळ यांच्याहस्ते प्रा. चौगुले यानी हा पुरस्कार स्वीकारला.

   या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कुलगुरू डॉ. के. प्रथापन, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, असोसिएट डीन संग्राम पाटील, प्रा. संदीप वाटेगावकर यानी अभिनंदन केले आहे.