*कोल्हापुरच्या विकासात राजाराम महाराजांचे मोठे योगदान - आमदार ऋतुराज पाटील*
schedule31 Jul 24 person by visibility 155 category

कोल्हापूर :
राजर्षी शाहूंच्या विचाराचा वारसा राजाराम महाराजांनी पुढे नेला. कोल्हापूरच्या विकासात त्यांचे फार मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. कसबा बावडा येथील राजाराम बंधारा ग्रुपच्यावतीने आयोजित राजाराम महाराजांच्या 127 व्या जयंती कार्यक्रमात आमदार ऋतुराज पाटील बोलत होते.
राजाराम बंधाराच्या ठिकाणी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह, मान्यवरांनी राजाराम महाराजाना अभिवादन केले.यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी, राजर्षी शाहू महाराजांनी रयतेच्या कल्याणाचे जे विविध उपक्रम राबवले होते ते राजाराम महाराजांनी पुढे चालू ठेवले. राजाराम महाराजांनी कोल्हापूराच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, शेती, औद्योगिक, आणि सहकाराच्या विकासासाठी प्रयत्न केले. क्रीडा, नाट्य सृष्टी, सिने सृष्टी साठीही त्यांनी राजाश्रय दिला. त्यामुळे कोल्हापूरच्या विकासात त्यांचे फार मोठे योगदान आहे. राजाराम महाराज यांचे नाव कोल्हापूरच्या जनतेच्या स्मरणात चिरंतन राहील.
राजाराम बंधारा ग्रुपने यानिमित्त घाट स्वच्छता, रक्तदान वृक्षारोपण सारखे विविध उपक्रम राबविले. यावेळी माजी नगरसेवक सुभाष बुचडे, मोहन सालपे, श्रीराम सोसायटीचे उपसभापती दत्ता मासाळ, संचालक मिलिंद पाटील, सुभाष गदगडे, विद्यानंद जामदार, राहुल माळी, मानसिंग जाधव, ज्ञानेश्वर मंडपाचे अध्यक्ष तानाजी चव्हाण, राजाराम बंधारा ग्रुपचे प्रा. डॉ. लक्ष्मण करपे, जितेंद्र केंबळे, राजाराम बंधारा ग्रुपचे कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.