+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustविशाल अनिल आवडे यांना पुरस्कार adjustउद्योगजकांशी सरंक्षण क्षेत्रातील संधीबाबत जनरल विनोद खंदारे यांचे मार्गदर्शन adjustविकास कामाच्या 'ऋतू' मध्ये निधीचा 'अमल' न झाल्याची टीका adjustशाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात विनय कोरे यांची डोकेदुखी वाढणार adjustशाही दसरा महोत्सवानिमित्त शुक्रवारी पारंपरिक वेशभूषा दिवस* adjustपुढील पाच वर्षात आणखी जोमाने काम करणार : आ. जयश्री जाधव adjustलोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी शुक्रवारपासून *दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर* adjustहळदी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बाजीराव चौगले adjustराज्यातील गरजूंपर्यंत प्रबोधनातून शासकीय योजनाही पोहोचवाव्यात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* adjustकिरण लोहार यांचा सन्मान
schedule07 Sep 24 person by visibility 55 categoryसामाजिक
कोल्हापूर ;
       राजारामपुरी येथील सहाव्या गल्लीतील तांत्रिक देखाव्यासाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या राजारामपुरी जय शिवराय तरुण मंडळ यांनी यंदाही आपले वेगळेपण जपत माता गौरीचा रुद्रावतार हा हलता भव्य तांत्रिक देखावा साकार केला आहे गेले आठ दिवस सदर देखावा जोडण्याचे काम अहोरात्र सुरू असून यंदाच्या वर्षी भारतातील हायड्रोलिक च्या साह्याने हालत्या देखाव्यासाठी प्रसिद्ध असणारे केरळ मधील श्री कुमार राजीव व त्यांच्या टीम यंदा मंडळाचा देखावा साकारत आहेत देखावे मध्ये माता गौरी आपल्यासाठी विनायक हा गण तयार करून व स्नानापूर्वी त्याला महालाच्या प्रवेशद्वारावर उभा करून माता गौरी स्नानाला जाते विनायक आपल्या मातेच्या आदेशाचे पालन करण्यासाठी दरवाज्याजवळ उभा राहतो इतक्याच समोरून महादेव येतात व त्यांना विनायक आडवतो यावेळी महादेव क्रोधित होऊन विनायकाचा शिरच्छेद करतात विनायकाच्या आवाजाने माता गौरी महालाबाहेर येऊन पाहते तर विनायकाचा शिरच्छेद झालेला असतो विनायकाच्या पुनजिर्वितासाठी माता गौरी महादेवाकडे विनंती करते पण महादेव ते नाकारतात याचवेळी देवी रुद्रवतार धारण करते हायड्रोलिक च्या साह्याने 16 फूट उंचीची रुद्रावतार धारण केलेली माता गौरी पृथ्वीच्या विनाश‌ करणार असे सांगते यावेळी तेथे ब्रह्मदेव अवतरतात व महादेवांना विनायकाच्या पुनर्जीवित कसे करायचे हे सांगतात महादेवाच्या आदेशाने नंदी हत्तीचे मस्तक घेऊन येतो व महादेव विनायकाला हत्तीचे मस्त लावतात व विनायकला पुनर्जीवित करतात विनायकाला पुनर्जीवित झालेले बघून क्रोधित झालेली माता गौरी शांत होते व सर्व देवगण विनायकास आशीर्वाद देतात असा हा देखावा सात मिनिटांचा असून बहुतांशी हालचाली हायड्रोलिक पंपावर होणार असून आत्ता पासून गल्लीमध्ये देखाव्याचे जोड काम पाहण्यास गर्दी होत आहे लहान मुलांपासून वयोवृध्दापर्यंत देखाव्याचे आकर्षण असणार आहे यंदाच्या वर्षी आज पर्यंतचे सर्व गर्दीचे उच्चांक मोडला जाईल असे मंडळाचे अध्यक्ष धनराज माने उपाध्यक्ष तेजस जगताप व विनीत कागले यांनी सांगितले आजपर्यंत राजारामपुरी जय शिवराय तरुण मंडळाने विविध सामाजिक प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे देखावे सादर केले आहेत याबद्दल विविध पुरस्काराने म्हणाला गौरवण्यात आले आहेत एसपीएन न्यूज तर्फे मागील वर्षाच्या तांत्रिक देखाव्यास प्रथम पारितोषिक सुद्धा मिळाले आहे.