+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या
schedule21 Mar 23 person by visibility 187 categoryराजकीय
साखर कारखान्यात काटा मारणाऱ्या महाडीकांचा आता काटा काढा: आमदार सतेज पाटील*

कोल्हापूर:- काटा मारणारे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनाच आता काटा काढून राजाराम सहकारी साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा करा. सभासदाचा मालकीचा कारखाना हवा असेल तर परिवर्तन आवश्यक आहे असे आमदार सतेज पाटील यांनी रूकडीत प्रचारार्थ सभेत बोलत होते.

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने आमदार सतेज पाटील यांनी राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीने सुरू केलेल्या प्रचारार्थ हातकणंगले तळंदगे, रुई, इंगळी,रुकडी या गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

इंगळी गावातील शेतकरी सभासद बाळासो नाईकवाडे यांनी इंगळी गावातील सभासद गत वर्षी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार तर ज्या पद्धतीने कारखान्यात सुरू असलेली हुकूमशाही बघून सत्ताधारी यांना मतदान न करणाच ठरले असल्याचे सांगितले

दत्त साखर कारखान्याचे संचालक नितीन पाटील यांनी इंगळे गावातून जास्तीत जास्त मतदान परिवर्तन पॅनल देणार आहे कारण येथील शेतकरी कारखान्याच्या कुठल्याही सुविधा मिळत नसल्यामुळे नाराज असल्याचं सांगितले.

रुई गावातील राजराम साखर कारखाना चे माजी व्हाईस चेअरमन बाबासो मकुभाई यांनी रुई गावाच्या विकासकाम साठी निधी उपलब्ध करून आमदार पाटील यांनी दिला. आमच्या परिसरातील ऊस साखर कारखानाला वेळेत घेऊन जात नाहीत कारखान्याकडून कुठलीही सहकार्याची भूमिका घेतली जात नाही आता मात्र परिवर्तन घडवून एकदा रुई गावचे उंच्याकी मतदान देण्याची ग्वाही दिली.

भगवान जाधव यांनी राजाराम साखर कारखाना निवडणूक मध्ये आम्ही विरोधात होतो मात्र आता आम्हला कळले शेतकऱ्यांना न्याय देणारे कोण महाडिकांच्या कदून शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तर ते पुरोगामी विचाराचे रुकडी गावचे सभासद आमदार पाटील यांच्या पाठीशी ठाम राहतील असा विश्वास व्यक्त केला.

तर सुरेश पाटील यांनी सांगितले की, रुकडी गावातील अनेक मयत सभासदांचे वारस नोंद केला नाही राजाराम साखर कारखान्याची टोळी ऊस तोडणी साठी सातत्याने मागणी करून सुद्धा आमच्या परिसरात पाठवली गेली नाही अशी नाराजी व्यक्त केली

माजी चेअरमन सर्जेराव माने सांगितले की, महाडिक यांना तज्ञ संचालक म्हणून घेतले पण हा व्यापारी संचालक यांच्यात भांडणे लावून कारखाना गिळकृंत केला. कारखान्याच्या दोनशे बैलगाडीचा खर्च राजारामवर, आणि बैलगाडी बेडकीहाळवर अशी लूट सुरू आहे. महाडीक विश्वासघातकी असून सहकारात भगवानराव पवार सारख्या चांगल्या माणसाचा घात केला. कारखान्यात पायपूसणी आणायाचे झाले तरी ते महाडिक यांना विचारावे लागते अशी स्थिती असून व्यापारीच्या हातातील कारखाना काढून सभासदांच्या मालकीचा व्हावा याकरिता सभासद यांनी बदल केला पाहिजे.

 आमदार सतेज पाटील बोलताना सांगितले की, गेली २८ वर्षे कारखान्याची लूट सुरू आहे. कारखान्यातील यंञापासून ते कामगार बेडकीहाळकडे नेवून राजाराम कारखान्याचे लूट सुरू असून महाडीक स्वताच्या फायद्यासाठी कारखाना चालवत आहेत. कारखान्यास सलग दहावर्ष उस घातला की एक वर्ष तोट्याचा समजावा अशी स्थिती आहे. बोगस सभासदाव्दारे कारखाना ताब्यात ठेवण्याचा कुटील डाव असून कारखाना सभासदांचा व्हावा व सहकारातील मंदिर टिकावे याकरिता आम्ही ही लढाई लढत असल्याचे सांगितले.
महाडिक यांनी डी. वाय. पाटील कारखान्यावर आरोप करू नये. डी. वाय. कारखानाने एफआरएफपेक्षा १५० रूपये ज्यादा दर देवून शेतकऱ्यांचे हित साधले. पण महाडिक हे राजाराम कारखान्याचा दर कमी देतात आणि त्यांच्या खासगी कारखान्याला जास्त दर देत असल्याचेही सांगितले. आता मात्र सभासदांनी ठरवले आहे की महाडिकानीं कारखान्यात काटा मारण्याची पद्धत आजही सुरू आहे त्यामुळे सभासदांना वेळ आली आहे महाडिकांचा काटा काढण्याची तो काढून परिवर्तन करावे असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले .

यावेळी रुकडी इथली बाजीराव पाटील, शशिकांत खवरे, ॲड.सुरेश पाटील, किरण भोसले, बाबासाहेब देशमुख, राजू ढवळे, शितल देसाई, बाबासाहेब कापसे आदीसह सभासद उपस्थित  
होते. 

अँड सुरेश पाटील  ,तळंदगे येथील सरपंच विठ्ठल पोळ, उपसरपंच संध्या कांबळे, महावीर पालखे,प्रकाश खोत, रवींद्र हवालदार ,तुकाराम सुतार, इंगळे गावातील शांतिनाथ चौगुले बाबुराव पाटील ,वैजयंती आंबी, दादासो मोरे ,प्रकाश खोडे ,रमेश शिंदे, बाळासाहेब नाईकवडी ,अजित मुजावर, बाबुराव बेनाडे ,पांडुरंग जाधव, बाळू मुल्ला ,सुनील वडगावे, अरुण माळी यांच्यासह तळंदगे इंगळी रुई रुकडी परिसरातील ऊस उत्पादक ऊस उत्पादक शेतकरी सभासद कार्यकर्ते उपस्थित होते