किरकोळ विक्रेता व फेरीवाला यांना सर्व योजना लागू कराव्यात
schedule27 Dec 22 person by visibility 486 categoryउद्योग

कोल्हापूर (पौर्णिमा पाटील, सिध्दी साळोखे) :
किरकोळ विक्रेता व फेरीवाला यांना सर्व योजना लागू कराव्यात,बाजार समितीमध्ये मतदानाचा अधिकार मिळावाया मागणीसाठीमहाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा खानविलकर पेट्रोल पंप ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरून काढण्यात आला.
यावेळी, किरकोळ विक्रेता फेरीवाला यांना बाजार समितीमध्ये मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने केंद्र सरकारच्या फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी केली जावी, किरकोळ विक्रेत्यांना मार्केटमध्ये अडत्या व व्यापारी लायसेन्स तसेच गाळे मिळाले पाहिजेत. केंद्र व राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या सर्व सामाजिक योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, या मागण्यांचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांना देण्यात आले.
या आंदोलनाच्या वेळी राजू जाधव, राज लायकर, जमीर बागवान, इम्रान बागवान, प्रविण माने (पैलवान), वैभव हिरवे, कृष्णात दिंडे, नयन गायकवाड, गणेश बुचडे, विशाल सावंत, अक्षय मदने, अक्षय माने, राजू बागवान, सरदार खाटीक, नरेश चिक्कोडीकर, सर्जेराव पाटील, आण्णा तिलवे, राज मकानदार, विशाल सपाटे, किरण बेडेकर, विशाल पाटील, फिरोज मुल्ला, सुनिल निरंकारी, किरण पोतदार, अजय चौगले, मनिष क्षीरसागर, किरण खाडे, राजू सँडी, कृष्णात खानविलकर, केदार पाटील, के. के. भाजीवाले, नाना सावंत, विकी मिसाळ, राजू लायकर, जमिर बागवान, इम्रान बागवान, यादव मामा, रशिद बागवान, विश्वास आंबी, प्रकाश माळी, नाना रेडेकर, प्रविण कांबळे, उमेश कांबळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.