कोल्हापूर
सामाजिक, सांस्कृतिक आणि युवा कार्यात अग्रेसर असणाऱ्या रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन फिनिक्सचा पदग्रहण सोहळा रोटरी समाज सेवा केंद्र येथे उत्साहात पार पडला.
मावळते अध्यक्ष रो अथर्व गायकवाड, सचिव रो अखिलेश जाधव यांनी सामाजिक काम जपत नूतन अध्यक्ष रो अखिलेश जाधव आणि नूतन सचिव रो विनोद जाधव यांच्याकडे पदभार सोपवला.
नूतन अध्यक्ष रो अखिलेश जाधव यांनी आरोहण राइझींग अपवर्ड्स या थीम च्या तत्वावर क्लब वर्षभर कार्यरत असणार असे सांगितले.
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन चे अध्यक्ष रो शरद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि रोटरी 3170 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो नासिर बोरसदवाला यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी डिस्ट्रिक्ट रोट्रॅक्ट रिप्रेझेंटेटिव रो प्रांजल मराठे, झोनल रोट्रॅक्ट रिप्रेझेंटेटिव रो अभिजित पाटील, रोट्रॅक्ट कमिटी चेअरमन रो राज पांचाळ उपस्थित होते.
या कार्यक्रमात खजाणीस रो प्रेरणा जाधव, क्लब सर्व्हिस रो निखिल कोळी, कम्युनिटी सर्व्हिस रो कोमल गुडाळे, प्रोफेशनल सर्व्हिस रो निखिल चव्हाण, इंटरनॅशनल सर्व्हिस रो स्फूर्ती खोत आणि इतर पदाधिकारी यांनी पदभार स्वीकारला.
यावेळी रोटरी रोट्रॅक्ट क्लब चे सर्व आजी माजी अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. रो राधिका जाधव आणि रो कोमल गुडाळे यांनी सूत्रसंचालन केले, सचिव रो विनोद जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.