+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustलेझर शोमुळे तरुणाच्या डोळ्याला रक्तस्राव adjustराजारामपुरी होणार स्त्री शक्तीचा जागर* adjustयशवंतराव चव्हाण(के.एम.सी.) काॅलेज मध्ये "आपत्ती व्यवस्थापन" भित्तीपत्रकाचे आयोजन adjustपत्नीची विचारपूसही न करणाऱ्या पतीला दणका दरमहा 10 हजार रुपये पोटगी देण्याचे न्यायालयाचे आदेश adjustनिगवे खालसा येथील श्री नृसिंह सरस्वती मंदिरास २ कोटींचा निधी; मा.आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्यास यश* adjustविद्यार्थांनी भविष्यात नाविन्यपूर्ण क्षेत्रामध्ये करिअर करावे adjust*डी वाय पाटील अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्यांची* *‘इस्रो’ सेंटरमध्ये इंटर्नशिपसाठी निवड* adjustमुहम्मद असिफ खलील मुजावर यांना ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार adjustशरद गायकवाड यांना 'क्रांतीबा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक' पुरस्कार adjustकोल्हापूरला खड्डेपुर करणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात ८१ प्रभागांमध्ये आंदोलन
schedule23 Aug 24 person by visibility 396 category
*राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 16 कोल्हापूर येथे क्रीडा स्पर्धांचे मोठ्या उत्साहात आयोजन* 

कोल्हापूर ;

           समादेशक नम्रता पाटील मॅडम (भापोसे ) यांचे मार्गदर्शनाखाली राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 16 कोल्हापूर येथे पोलीस जवानांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर क्रीडा स्पर्धांमध्ये हॉकी, फुटबॉल, खोखो, कबड्डी, बास्केटबॉल हे सांघिक खेळ व रनिंग, रिले, गोळा फेक इ. अनेक खेळांचे आयोजन केले होते. 
          खेळ हे आरोग्यासाठी महत्त्वाची शिदोरी असल्याचे प्रतिपादन समादेशक नम्रता पाटील मॅडम (भापोसे ) यांनी करून आगामी क्रीडा स्पर्धांसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. नंदवाळ कवायत मैदान येथे सदरचे क्रीडा स्पर्धा सांगता समारोह पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक समादेशक हिंगरूपे व आभार प्रदर्शन सहायक समादेशक सदांशिव यांनी केले. कार्यक्रमास पीआय लीपरे, तांदळे, सहस्रबुद्धे पीएसआय
गेंगजे, शेळके , गुप्ता, झीटे, सावंत, वारंग हे उपस्थित होते. क्रीडा स्पर्धांचे नियोजन पीएसआय महेश साळुंखे, पोलीस हवालदार शितल पवार, दीपक मलाई, गायकवाड व शिकलकर व सर्व खेळाडू अंमलदार यांनी केले. स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद सी कंपनी यांनी प्राप्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पीएसआय
 अशोक गुजर यांनी केले.