
कोल्हापूर (आवाज इंडिया)
स्वराज्य तालीम मंडळ संयुक्त राजेंद्र नगर कोल्हापूर
*यांच्यावतीने सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन 2023 महोत्सवाची भव्य लेझीम ताफ्या सहित मिरवणुकीची द्वारे सांगता उत्साहात झाली.
*स्वराज्य तालीम मंडळ संयुक्त राजेंद्र नगरच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षीही 20 ऑक्टोंबर ते 24 ऑक्टोबर पर्यंत विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी हा महासोहळा संपन्न झाला.*
24 ऑक्टोंबर 2023 रोजी सायंकाळी 5:00 तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक राजेंद्र नगर ते बुद्ध गार्डन शास्त्रीनगर पर्यंत काढण्यात आली*
*या मिरवणुकीचे उद्घाटन भारतीय बौद्ध समाज कोल्हापूरचे अध्यक्ष रंगराव पांडे सर तसेच मंडळाचे संस्थापक सुखदेव दादा बुध्याळकर यांच्या हस्ते व तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ची पूजन करून सामुदायिक पंचशील ग्रहण करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.*
*या मिरवणुकीमध्ये 120 लेझीम खेळाडूंचा ताफा व पारंपारिक वाद्याचा समावेश करुन विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्धांच्या व जय भीम च्या जयघोशात हि मिरवणूक संपन्न झाली.*
**या मिरवणुकीत राजेंद्र नगर मधील जवळपास 1500 ते 2000 अबाल वृद्ध माता भगिनी भीमसैनिक यांनी आणि सहभाग घेतला या मिरवणुकीला राजारामपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे साहेब आंबेडकर चळवळीतील उत्तम दादा कांबळे ,अजय कुरणे, माझी पोलीस उपनिरीक्षक अण्णाप्पा कांबळे, यांनी या मिरवणुकीला सदिच्छा भेट दिली.*
*या मिरवणुकीत स्वराज्य तालीम मंडळाचे संस्थापक सुखदेव दादा बुध्याळकर,माजी अध्यक्ष पंकज आठवले, उत्सव कमिटी अध्यक्ष प्रवीण बनसोडे, मिरवणूक कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण कांबळे (k k), खजानिस सुरेश आठवले, तसेच उपाध्यक्ष अशोक शिवशरण उपाध्यक्ष चंद्रकांत शिवशरण, शिवराम बुध्याळकर, रंगनाथ शिवशरण, भारत प्रक्षाळे, रविंद्र भोपळे तसेच आंबेडकरी चळवळ येथील राजेंद्र नगर मधील सामाजिक कार्यकर्ते नामदेव नागटिळे, निलेश बनसोडे प्रवीण वाघमारे, राजू शिंदे, दयानंद गालफाडे, तसेच धम्म बांधव बाल उपासक उपासिका 1500 ते 2000 नागरिक या मिरवणुकीमध्ये उपस्थित होते.*