Awaj India
Register
Breaking : bolt
जिद्दीला मिळाले यश! २०२० पासूनच्या संघर्षानंतर रूथ सकटे पोलीस भरतीत चमकलीजिद्दीला मिळाले यश! २०२० पासूनच्या संघर्षानंतर रूथ सकटे पोलीस भरतीत चमकली​अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देणाऱ्या पालकांवर गुन्हे; कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाईकोल्हापूर पोलीस दलाचे 'ऑल आऊट ऑपरेशन': जिल्ह्यात गुन्हेगारांवर मोठी कारवाई, ठाण्यातील बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद*डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे* *दोन संशोधक देशात ‘टॉप टेन’ मध्ये* कलाकारांच्या मानधनाची बैठक त्वरित घ्या; जिल्हा परिषद अध्यक्षांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीबेरोजगार उमेदवारांसाठी इस्राईल येथे 3500 रोजगाराच्या संधी*घरफोडी टोळीचा पर्दाफाश; ४ आरोपी अटकेत, ८.५० लाखांचा मुद्देमाल जप्तआदिल फरास साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भव्य “कोल्हापूर थाळी”चे आयोजननगरसेवक आदिल फरास यांच्या वाढदिवसानिमित्त पांजरपोळ येथे चारा दान

जाहिरात

 

जिद्दीला मिळाले यश! २०२० पासूनच्या संघर्षानंतर रूथ सकटे पोलीस भरतीत चमकली

schedule07 May 26 person by visibility 13 categoryशैक्षणिक

 
गांधीनगर:आवाज इंडिया प्रतिनिधी 
 
गांधीनगर परिसरात राहणारी कु. रूथ गीता राजेंद्र सकटे हिने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस भरती प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सन २०२० पासून सातत्याने प्रयत्न करत अखेर तिने यश मिळवत आपल्या स्वप्नांना गवसणी घातली आहे.
नवी मुंबई येथे झालेल्या पोलीस भरतीत महिला राखीव प्रवर्गामध्ये तिने एकूण १४ उमेदवारांपैकी ८ वा क्रमांक पटकावत आपल्या कुटुंबाचे व परिसराचे नाव अभिमानाने उज्ज्वल केले आहे.
या यशामागे तिची आई गीता राजेंद्र सकटे व सरदार मित्तभ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच तिने जिद्द न सोडता अथक परिश्रम करून हे यश संपादन केले.
तिच्या या कामगिरीमुळे गांधीनगर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes