आपली आवड व कौशल्य ओळखून विद्यार्थ्यांनी करिअर निवडावे- डॉ महादेव नरके*
schedule05 Jun 23 person by visibility 114 category
-डी.वाय.पी पॉलिटेक्निक 10वी नंतरच्या संधीबाबत कार्यशाळा ..
विद्यार्थ्यांनी आपली आवड, आपल्यातील क्षमता आणि कौशल्य ओळखून करिअरची दिशा निवडावी, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले. डॉ. डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकतर्फे आयोजित '१० वी नंतरच्या करियरच्य संधी व डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया' याविषयावर कार्यशाळेत ते बोलत होते.यावेळी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. नितीन माळी यांनी विविध संधीबाबत मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. महादेव नरके म्हणाले, १० वी नंतर कोणती शाखा निवडावी, करियरची दिशा काय असावी, भवितव्य नेमकं कशात आहे ? असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडलेले असतात. सध्या करियरच्या खूप मोठ्या संधी अनेक क्षेत्रात निर्माण झाल्या आहेत. रोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. अशा परिस्थितीत आपली आवड, आपल्यातील क्षमता आणि अंगी असलेलं कौशल ओळखून विद्यार्थांनी करियर निवडावे. पालकांनी आपली आवाड विद्यार्थ्यांवर लादू नये. आपल्यातील वेगळंपण ओळखा आणि त्यामध्ये करियर करा, असेही त्यांनी सांगितले.
ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक नितीन माळी यांनी, विद्यार्थी व पालकांना पीपीटीच्या माध्यमातून दहावीनंतर कोणकोणत्या करिअरच्या संधी आहेत याची माहिती दिली.
डॉ. नरके व प्रा माळी यांनी विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न,शंका यांचे निरसन केले. यावेळी उपप्राचार्य मीनाक्षी पाटील, रजिस्ट्रार सचिन जडगे, प्रा. महेश रेणके, प्रा.बी.जी. शिंदे, प्रा.अक्षय करपे, प्रा.पी.के. शिंदे, यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.