
पन्हाळा (प्रतिनिधी) : ऐतिहासिक पन्हाळगडावरील मुख्य प्रवेशद्वार असलेला चार दरवाजा येथे सादोबा तलाव आहे.
तलावाजवळ पूर्वीच्या काळी या मोटवीनाचा वापर पाणी खेचण्यासाठी करत असत . मोटवानीच्या भिंतीचा काही भाग बुधवारी सतत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे सकाळी ११.३० कोसळला होता. जवळपास ४० ते ५० फूट उंच अशी ही मोटवान पावसाचा जोर कायम असलेमुळे गुरुवारी पहाटे संपूर्ण भिंत ढासळली आहे. याही आधी मागील वर्षी सतत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे तलावाला संरक्षण देणारी भिंत कोसळली होती .स्थानिकांनी याचा पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतलेली नाही. नागरिकांनी व नगरपरिषद प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अडचणी व निधी याबाबत प्रतिक्रिया दिल्या.