कोल्हापूर (आवाज इंडिया प्रतिनिधी)
कोल्हापुरात एका महिलेच्या मदतीने प्रवेश केलेला बुवा बाबाने आतापर्यंत दोन गुप्त पूजा केल्या आहेत. आणखीन पूजा होणार आहेत. बाबाच्या या करनाम्याने एका कार्यालयातील 3 महिलांनी अखेर नोकरीचा राजीनामा दिला आहे.
एका महिलेचे अनेक उद्योग आहेत. हे उद्योग सांभाळण्यासाठी या कार्यालयामध्ये 10 ते 12 कर्मचारी आहेत. यामध्ये 6 ते 7 महिला आहेत. उद्योगी असलेल्या महिले नंतर आता या बाबाची नजर कार्यालयातील इतर महिलांच्या वरती पडली. ही काय करते ? ती काय करते ? ह्याच्या पाठीवर तीळ आहे, याच्या आणि कुठेतरी तीळ आहे, हिचा नवरा लफडेबाज आहे, तिचा नवरा जरा चांगला आहे अशा भुलथापा सांगत या बाबाने महिलांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला.
काही अंधश्रद्धेच्या बळी गेलेल्या महीला या बाबाचं ऐकायला तयार झाल्या मात्र हे पूर्णपणे चुकीचे आहे असे म्हणत या कार्यालयातील इतर महिलांनी या गोष्टीला विरोध केला. बाबाच्या उचपती बघून अखेर काही महिलांनी नोकरीचा राजीनामा दिला असल्याची माहिती पुढं आली आहे.
बाबा एवढ्यावर शांत बसला नाही तर बाबांना कार्यालयातील वास्तुशास्त्र बदलून टाकण्यासाठी काही फोडाफोडी पण केली. भिंतीच्या फोडाफोडी बरोबर या बाबाने महिला कर्मचाऱ्यांची सुद्धा फोडाफोडी केली.
आता काही महिलांना सांगलीत बोलवले असल्याची चर्चा आहे. बाबाचा सांगलीत मोठा आश्रम असल्याच सांगितलं जातं आहे. या ठिकाणी महिलांना नेऊन त्याच ठिकाणी पूजा करावी, असा घाठही बाबाला आहारी गेलेल्या उच्चशिक्षित महिलेन केला आहे.
क्रमश: - बाबाचं बोगस राजकीय कनेक्शन आणि राजकीय भूलथापांची धुळवड