कोल्हापूर : यशवंतराव चव्हाण (के एम सी) कॉलेज मध्ये वृक्षबंधन या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन भूगोल विभागाच्या वतीने करण्यात आले. या निमित्ताने महाविद्यालय परिसरात वृक्षलागवड व वृक्षबंधन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. बी. एन. उलपे यांचे हस्ते करण्यात आले. पर्यावरण रक्षणासाठी झाडांचे महत्व आहे असे मत त्यांनी व्यक्त केले व या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक ही केले. महाविद्यालय परिसरात आणखी झाडे लावून हा परिसर पर्यावरणपूरक बनवूया असा ही संकल्प केला.भूगोल विभाग प्रमुख डाॅ. जे. एम. शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ युवराज मोटे यांनी केले तर आभार प्रा आरती कणेरी यांनी मानले. या कार्यक्रमास ग्रंथपाल रविद्र मांगले, प्रा. पी. डी. तोरसकर, डाॅ. संजय कांबळे, डाॅ प्रशांत नागावकर, प्रा. किरण भौसले, प्रा. राम पवार व महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.