पंचवीस वर्षे योगाचा प्रसार करणाऱ्या विना मालडीकर
schedule21 Jun 21 person by visibility 999 categoryआरोग्य
कोल्हापूर:-आरोग्य सुदृढ राहावं, मनाची एकाग्रता वाढावी, उत्साही वाटावं यासाठी कायमचे योग उपयोगाचा आहे. उदरनिर्वाहासाठी गेलेल्या विना विजय मालडीकर यांना 25 वर्ष योगाला वाहून घ्यावं लागतं याचं त्यांना समाधान वाटतं. राजारामपुरी बारावी गल्ली कोल्हापूर येथे त्या सोहम योग वर्ग चालवतात.
उदरनिर्वाहासाठी त्यांनी योग शिक्षिका म्हणून नोकरी करावं असं त्यांचे गुरु शेट्टी यांनी सांगितलं. नोकरी करता करता आजच हजार लोकांना योग तज्ञ म्हणून शिकवतात स्वतः योगाचे क्लासेस येतात. प्रत्येक घरात योग शिक्षक असावा असे मतही मालडीकर यांनी व्यक्त केलं.
निरोगी रहावे, वेगवेगळ्या आजारावर उपचार व्हावे म्हणून अनेक जण योगा क्लास लावतात प्रत्येकाच्या आयुष्यात योग महत्त्वाचा आहे. रक्तप्रवाह, मनाची एकाग्रता, सुखी समृद्धी जीवन यासह आत्ता कोरोणाच्या काळात सुद्धा योगा ला महत्त्व आहे. योगामुळे अनेकांचे जीवन बदलून गेले असल्याचे मत मालडीकर यांनी सांगितले व्यक्त केले.
यामुळे लोकांच्या मनातील ताण तणाव जातो मालडिकर यांच्या मुलगा सुद्धा योगाचे क्लास घेतो तर मुलगी मुंबई या ठिकाणी योगाच्या क्लास घेते.
प्रत्येकाने किमान एक तास योगा करावा असे आव्हान हे मालडिकर यांनी केले. वयाच्या पन्नासाव्या वर्षी सुद्धा त्या तेवढ्याच उत्साहाने स्वतः योगा करत योगा शिकवत आहेत. योगाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी कोल्हापुरात त्यांना योगपंडित ओळखले जाते.