सभासदांच्या गृहकर्जासाठी प्रयत्न करणार : एम. आर. पाटील
schedule12 Jan 23 person by visibility 170 categoryराजकीय

कोल्हापूर आवाज इंडिया
भविष्यात कर्मचाऱ्यांना गृह कर्ज देण्याचा प्रयत्न करणार असून सभासदांच्या हिताचा निर्णय सुद्धा घेणार असल्याचं मत पॅनल प्रमुख एम. आर. पाटील यांनी व्यक्त केलं.
जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी निवडणूक प्रचार प्रसंगी ते शाहूवाडी, पन्हाळा या ठिकाणी बोलत होते.
यावेळी बचाव कमिटीचे माजी अध्यक्ष विश्वास साबळे, आरोग्य विभागाचे अध्यक्ष एम. एम. पाटील, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजाराम वरुटे, शिवाजी पतसंस्थेचे अध्यक्ष एस. व्ही. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पाटील म्हणाले, अकरा कर्मचारी भरती प्रकरणी संस्थेच्या बाजूने निकाल लागला असून चुकीच्या प्रवृत्तीवर अंकुश निर्माण झाला आहे. कर्जावरील व्याजदर कमी करणार,सभासदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी विविध उपक्रम राबविणार आहे.
साबळे म्हणाले, महालक्ष्मी पॅनेल अस्तित्वात आले त्यावेळी केडीसी बँकेत क्रेडिट बंद केली होती,सभासद ठेवी काढून घेत होते, हफ्ते भरत नव्हते, संस्था अवसानात निघणार होती. अशावेळी आम्ही एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करत संस्थेचा आलेख वाढवला 2008/ 9 साली संस्थेच्या 35 कोटी उलाढाल होती. ते 2021/ 22 ला 463 कोटी झाली आहे. 2008 ला कर्ज पुरवठा अडीच लाख होता आज 35 लाख झाला आहे. संस्थेच्या इमारतीतून लाखो रुपये संस्थेला मिळते अशी प्रगती सत्ताधारी पॅनलच्या मंडळींनी केली आहे.संस्थेचा आलेख असाच वाढायचा असेल तर सभासदांनी सत्ताधारी पॅनलला विजयी करावे.