+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustविशाल अनिल आवडे यांना पुरस्कार adjustउद्योगजकांशी सरंक्षण क्षेत्रातील संधीबाबत जनरल विनोद खंदारे यांचे मार्गदर्शन adjustविकास कामाच्या 'ऋतू' मध्ये निधीचा 'अमल' न झाल्याची टीका adjustशाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात विनय कोरे यांची डोकेदुखी वाढणार adjustशाही दसरा महोत्सवानिमित्त शुक्रवारी पारंपरिक वेशभूषा दिवस* adjustपुढील पाच वर्षात आणखी जोमाने काम करणार : आ. जयश्री जाधव adjustलोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी शुक्रवारपासून *दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर* adjustहळदी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बाजीराव चौगले adjustराज्यातील गरजूंपर्यंत प्रबोधनातून शासकीय योजनाही पोहोचवाव्यात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* adjustकिरण लोहार यांचा सन्मान
schedule22 Aug 24 person by visibility 82 category
*बोंद्रे नगर मातंग वसाहतमधील* 
*घरकुलांची कामे सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा* 

-आमदार सतेज पाटील यांच्या सूचना 
-अधिकाऱ्यांसोबत घरकुल योजना पाहणी
-वीज,रस्ता,पाणीपुरवठ्याबाबत कार्यवाही करा 

.कोल्हापूर :

 फुलेवाडी रिंग रोडवरील बोंद्रेनगर मातंग वसाहतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुलांची कामे सप्टेंबर महिन्याच्या आत पूर्ण करावीत, अशा सूचना आमदार सतेज पाटील यांनी कंत्राटदार आणि अभियंत्यांना केल्या. या घरकुलांच्या पाहणीदरम्यान कंत्राटदार, अभियंते, महापालिका आणि महावितरण कंपनीचे अधिकारी यांच्यासोबतच्या बैठकीत ते बोलत होते. या परिसरात वी , पाणी कनेक्शन व चांगले रस्ते करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

   आमदार सतेज पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून फुलेवाडी रिंगरोडवरील बोंद्रे नगर मातंग वसाहतीमधील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ७७ कुटुंबियांना घरकुल मंजूर झाली आहेत. घरकुलासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांची सबसिडी, सीएसआर फंडातून ५० हजार तर शेल्टर असोसिएट्सद्वारे ३० हजार असे एकूण ३ लाख ३० हजार रुपये मिळणार असून लाभार्थ्याला २ लाख ७० हजार भरावे लागणार आहेत. या योजनेतील ७७ पैकी २७ घरकुलांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित ५० घरकुलांचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. 

आमदार सतेज पाटील यांनी या घरकुलांच्या कामाची पाहणी केली. घरकुलांची कामे दर्जेदार करून सप्टेंबरच्या आत काम पूर्ण करावे, अशा सूचना त्यानी कंत्राटदार राजेंद्र दिवसे आणि अभियंता अविनाश पोखर्णीकर यांना दिल्या. या परिसरात पाण्याची कनेक्शन, चांगले रस्ते, विजा जोडणी आदी कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना महापालिकेचे नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक विनय झगडे आणि उपशहर अभियंता महादेव फुलारी, महावितरणचे सहाय्यक अभियंता मनोहर पवार यांना दिल्या.

   यावेळी माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक राहुल माने, इंद्रजीत बोंद्रे, अभिजीत चव्हाण, महिपतराव बोंद्रे गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन अशोक देगावे, व्हाईस चेअरमन भिकाजी वायदंडे, शेल्टर असोसिएशनच्या संचालिका प्रतिमा जोशी, आर्किटेक्ट ऋतुजा भराटे, मनोज्ञा कुलकर्णी, मेघा लोंढे, महादेव कांबळे,बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक मयूर गाढवे, व्यवस्थापक क्षुब्धा कुरकुटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.