+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule20 Feb 23 person by visibility 244 categoryशैक्षणिकशैक्षणिक
*कोल्हापूर:* 
 भारती विद्यापीठाचे डॉ पतंगराव कदम महाविद्यालय आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे यांच्यात नुकताच सामंजस्य करार संपन्न झाला. या करारामुळे दोन्ही संस्थांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर संशोधन करण्यासाठी नवे व्यासपीठ मिळाले आहे. या करारामध्ये विद्यार्थी- प्राध्यापक विनिमय कार्यक्रम,जोड प्रकल्प, प्रगत संशोधन अशा बहूआयामी बाबी राबविण्यात येणार आहेत.
भारती विद्यापीठाचे डॉ पतंगराव कदम महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उदघाटन कार्यक्रमात हा सामंजस्य करार संपन्न झाला. यावेळी डी.वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.प्रथापन, डॉ. होमी भाभा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ आर के कामत, प्राचार्य डॉ.डी.जी.कणसे, उपप्राचार्य डॉ एस एन बोऱ्हाडे, उपप्राचार्य व आयक्यूएसी समन्वयक डॉ.ए.आर.सुपले, अवकाश वैज्ञानिक व परिषदेचे समन्वयक डॉ.दादा नाडे, डॉ. संदीप वाटेगावकर, डॉ राणी पवार, डॉ.के.डी.सोनवणे, प्राचार्य डॉ.एच.एम. कदम डॉ.संभाजी पवार, डॉ हेमराज यादव, डॉ तृशांत लोहार, डॉ. धनवडे व आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन म्हणाले " दोन्ही संस्था मिळून भविष्यात संशोधन उपक्रम राबवू व गरीब, होतकरू विद्यार्थ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनासाठी संधी उपलब्ध करून देऊ असे बोलून त्यांनी "डी वाय पाटील" ग्रुप बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. 
प्राचार्य डॉ. डी.जी.कणसे यांनी कराराद्वारे संयुक्तिरीत्या आंतराष्ट्रीय परिषदा, चर्चासत्र व कार्यशाळा घेऊ व भविष्यात आंतराष्ट्रीय पातळीवर संशोधन करण्यासाठी दोन्ही संस्था पुढाकार घेतील असे मत व्यक्त केले.
कुलसचिव डॉ.जे.ए.खोत यांनी या कराराबद्दल आनंद व्यक्त करीत विद्यार्थी शिक्षक विनिमय, संशोधन शोधनिबंध, प्रस्ताव, सेमिनार, कौशल्ययुक्त कोर्सेस संयुक्तरित्या राबविण्यासाठी कटिबद्ध राहू असे आश्वासन दिले.
हा करार यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी डॉ.एस एन.बोऱ्हाडे, डॉ.ए.आर.सुपले, अवकाश वैज्ञानिक डॉ.दादा नाडे, "डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे असोसिएट डीन डॉ. गुरुनाथ मोटे व डॉ. संदीप वाटेगावकर यांनी अथक परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन प्रा.भारती भावीकट्टी व आभार प्रदर्शन डॉ दादा नाडे यांनी केले.