०५/०१/२०२४
*खासदार धनंजय महाडिक यांचा केरळ मधील जनतेशी सुसंवाद*
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेनुसार, देशभरात विकसीत भारत संकल्प यात्रेचे आयोजन केले आहे. देशातील सर्व नागरिकांना अगदी शेवटच्या घटकापर्यंत केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी संकल्प भारत यात्रा सुरू झाली असून, त्याला नागरिकांचाही उदंड प्रतिसाद मिळत आहे. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर केरळ मधील वडकरा लोकसभा मतदार संघातील गावांमध्ये जावून, विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी होण्याची जबाबदारी दिलेली आहे. त्यानुसार खासदार महाडिक केरळ मधील विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झाले असून, थेट जनतेशी संवाद साधत आहेत. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देऊन, नागरिकांना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करत आहेत. वास्तविक केरळ राज्यात भारतीय जनता पार्टीचा एकही खासदार नाही. मात्र तरीही विकसित भारत संकल्प यात्रेला केरळमधील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. किसान क्रेडिट कार्ड, पीएम किसान सन्माननिधी, आयुष्यमान भारत कार्ड यासह विविध योजनांचा लाभ मिळत असल्याने, नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. केरळ मध्ये नारळ आणि केळी हे प्रमुख पीक आहे. नारळाचे तेल आणि नारळाच्या पाण्यापासून औषधी पदार्थ बनवण्यासाठी, केरळ मधील नागरिकांकडून, केंद्र सरकारच्या योजनांचा प्रामुख्याने लाभ घेतला जात आहे. तसेच मत्स्यसंपदा म्हणजे मच्छिमार लोकांसाठी मोफत जाळी मिळणं किंवा मत्स्यबीज तयार करण्यासाठी अनुदान, शेततळी बनवण्यासाठी अनुदान अशा अनेक योजनांना केरळ मधील जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याचबरोबर पीएम विश्वकर्मा योजनाही केरळमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे. त्यातून कष्टकरी आणि पारंपारिक अठरापगड व्यवसायांना मोठी चालना मिळत आहे. शिवाय पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ, हातगाडीवाले, फेरीवाले, भाजीवाले, रिक्षावाले, यांना होत असल्याने, केरळ मध्ये भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनाधार वाढत आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून खासदार धनंजय महाडिक, केरळ मधील जनतेत थेट मिसळत असून, केंद्रातील मोदी सरकारच्या योजना जनतेपर्यंत नेण्यात यशस्वी झाले आहेत.