*कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात निधी कमी पडू देणार नाही - माजी आमदार अमल महाडिक*
schedule26 Dec 23 person by visibility 103 categoryराजकीय
*प्रभाग क्रमांक 58,59 मध्ये 1 कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन*
माजी नगरसेवक किरण नकाते आणि माजी नगरसेविका माधुरी नकाते यांच्या पाठपुराव्यातून प्रभाग क्रमांक 58 आणि 59 मध्ये विविध विकास कामे होत आहेत. या विकास कामांचे उद्घाटन माजी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना महाडिक यांनी नकाते दांपत्याने जपलेला लोकसेवेचा वारसा खरोखरच कौतुकास्पद आहे असे नमूद केले.
या दोन्ही प्रभागांमध्ये मिळून तब्बल 97 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून अंतर्गत रस्ते, गटारी तसेच अन्य विकासकामे लवकरच पूर्णत्वाला जातील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असा विश्वास माजी आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला. भागातील विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी आमदार अमल महाडिक यांचा सत्कार यावेळी परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम,भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव,अमर नकाते,रघुनाथ शेळके,बाबसो जाधव,रमेश लाड,विमल पाटील , ज्ञानदेव पाटील,सविता पदारे,ज्योती नकाते,रजनी मयेकर,रुपाली पोवार,कृष्णात पाटील यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते.