+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustवर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणार्या ड्रायव्हरांचे वेतन कपात adjustरत्नागिरी व सिंधुदुर्ग नागरी संरक्षण कार्यालयाच्या "उपनियंत्रक गट अ" पदासाठी* *इच्छुकांनी नावे कळवावीत* adjustदक्षिण मधील मतदारांना सुज्ञ उमेदवाराचे आवाहन adjustभाजपचे बंडखोर वसंत पाटील दक्षिण मधून निवडणुकीच्या तयारीत adjustसुकेशनी सुरेश कांबळे ऊर्फ सई स्वप्निल डिगे नेट परीक्षा उत्तीर्ण adjustमार्केट सेसच्या सुधारित जी आर चे व्यापाऱ्यांच्याकडून साखर पेढे वाटून स्वागत adjustपालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून बांधकाम कामगारावर अन्याय adjustकेंद्रीय रेल्वे व जलशक्ती राज्यमंत्री श्री. व्ही. सोमन्ना यांचा जिल्हा दौरा adjustमिशन रोजगार’ अंतर्गत रविवारी* *कॉर्पोरेट स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम* adjustकोल्हापुरातील महायुतीच्या तीन विधानसभा मतदार संघात ठिणगी
schedule19 Oct 24 person by visibility 25 categoryराजकीय

कोल्हापूर (प्रशांत चुयेकर)

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपचे करवीर तालुका अध्यक्ष वसंतराव पाटील निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विकास कामे होत नसून आपणच रिंगणात उतरून सर्वसामान्यांना न्याय देणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितलं.
कंदलगाव (ता. करवीर) या ग्रामपंचायतवर वीस वर्ष पाटील यांची सत्ता आहे. नुकताच त्यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेत मेळावा घेतला. कळंबा, मोरेवाडी,कंदलगाव कोगील, दर्याचे वडगाव, निगवे आदी परिसरातील कोल्हापूर दक्षिण मधील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. 
 कार्यकर्त्यांच्या या मेळाव्यात त्यांनी निवडणूक लढवत असल्याचा निर्णय जाहीर केला. या मेळाव्यात भाजपबरोबर काँग्रेसचे ही कार्यकर्ते उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण मतदार संघात त्यांनी डिजिटल फलक लावत आपली उमेदवारी ही जाहीर केली होती.
पाटील हे भाजपचे करवीर तालुका अध्यक्ष होते. त्यांनी बोलवलेल्या मेळाव्यामध्ये दक्षिण मधील भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे नेमका फटका कोणाला बसणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.