Awaj India
Register
Breaking : bolt
अंगणवाडी सेविकेच्या कार्याची उल्लेखनीय कामगिरी; ज्योती कांबळे यांचा गौरवपल्लवी गोसावी यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवडतंत्रस्नेही शिक्षक म्हणून शहाजी गायकवाड यांची उल्लेखनीय कामगिरीडॉ. हरीश भालेराव यांची ‘नॅशनल आयडियल टीचर लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड-२०२६’साठी निवडडी. वाय.पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा* *देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकार*नवीन शैक्षणिक धोरणातील कार्यभार व CHB प्राध्यापकांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्याबालकांसाठीचा पोक्सो कायदा कनिष्ठ महाविद्यालयांच्या संचमान्यतेतील अन्यायकारक निकष बदलण्याची मागणीसामाजिक क्षेत्राला नियमनाची दिशा; ‘महा सीएसआर प्राधिकरणा’कडे महाराष्ट्राची वाटचाल**डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या* *विद्यार्थ्यांना १८५ हून अधिक जॉब ऑफर्स*

जाहिरात

 

किरण लोहार यांचा सन्मान

schedule01 Oct 24 person by visibility 693 categoryशैक्षणिक

*उल्लास -नवभारत साक्षरता कार्यक्रम -राज्यस्तरीय उल्लास मेळावा -किरण लोहार यांचा सन्मान* '

कोल्‍हापूर;

जन जन साक्षरता 'या संकल्पनेतून केंद्र शासनाने हाती घेतलेल्या नवभारत साक्षरता कार्यक्रमाची ठोस अमंलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणाधिकारी योजना श्री किरण लोहार यांनी केली. 
वय वर्षे 15 ते त्यापुढील वयोगटातील निरक्षर लोकांना(असाक्षर )पायाभूत साक्षरता, संख्यज्ञान , जीवन कौशल्य विकसित करण्या साठी स्वयंसेवक, शिक्षक , विद्यार्थी यांना उचित मार्गदर्शन करत स्वतः पुढाकार घेऊन काम केले. त्याच बरोबर पुणे येथील रत्नागिरी जिल्ह्याची स्टॉल मांडणी पाहून मा. महेश पालकर साहेब , संचालक योजना , मा. राजेश क्षीरसागर साहेब उपसंचालक योजना पुणे यांनी भेट देऊन तयारी पाहून समाधान व्यक्त केले. रत्नागिरी जिल्ह्या ने केलेल्या अतिउत्कृष्ट कामकाजा बद्दल रविवार दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी राज्यस्तर नवभारत साक्षरता मेळावा , एस सी आर टी पुणे येथे उत्साहात संपन्न झाला.शिक्षणाधिकारी (योजना )डॉ.किरण लोहार यांच्या या सेवेचा सन्मान शिक्षण मंत्री माननीय श्री दिपक केसरकर यांचे शुभ हस्ते करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय सचिव अर्चना शर्मा , प्रधान सचिव आय ए कुंदन , शिक्षण आयुक्त सूरज मांढरे , राज्य प्रकल्प संचालक आर विमला , संचालक मा. श्री राहुल रेखा राव , शिक्षण संचालक शरद गोसावी , संचालक कृष्णकुमार पाटील , शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक संपत सुर्यवंशी , अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद नंदकुमार बेडसे , शिक्षण संचालनालय(योजना )महाराष्ट्र राज्य डॉ महेश पालकर या मान्यवरांची उपस्थिती होती. श्री. किरण लोहार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रेरणा न मार्गदर्शन -1.मा. ना उदय सामंत, पालकमंत्री,2.मा.एम देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी , मा.कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी
योगदान -1.सर्व स्टाफ योजना विभाग, 2.सर्वं गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक संघटना, शिक्षक
डाएट प्राचार्य व स्टाफ
सर्व नवसाक्षर, स्वयंसेवक यांनी अतिशय मन लावून केलेले काम, रत्नागिरी जिल्ह्याने दिलेल्या उद्दिष्ट च्या 200% हुन अधिक केलेले काम, त्यातील सातत्य यामूळ 35 मंजूर स्टाफ पैकी फक्त्त, 3 च जण कार्यरत असताना हे यश मिळवू शकलो यांचा खूप अभिमान वाटतो.
मा. संचालक, पालकर साहेब, उपसंचालक क्षीरसागर साहेब व राज्य योजना विभाग यांचे अनमोल असे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले....

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes