Awaj India
Register
Breaking : bolt
नदी प्रदूषित करणाऱ्यांच्यावर कारवाई करावीविमानतळ भूसंपादन प्रकियेतील बाधित कुटुंबांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक तातडीने करा; बर्ड फ्ल्यूबाबत नागरिकांनी अफवा पसरवू नयेत - डॉ. महेश शेजाळवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून कागल तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत बैठक*राजाराम महाविद्यालय प्रशासनाकडून न्याय मिळावा; प्रा वगरेगोकुळ’ दूध संघ कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सचिन पाटील व व्हा.चेअरमनपदी पांडुरंग कापसे यांची बिनविरोध निवडlडॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निक येथे वाचन संवाद उपक्रम*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ संघात निवडशैक्षणिक -औद्योगिक दरी दूर होईल- बॉबी क्यूरॅकोससीपीआरमधील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तात्काळ सादर करा : आमदार राजेश क्षीरसागर

जाहिरात

 

अखिल भारतीय सर्जन संघटनेच्या (ASI) सचिव पदी डॉ. प्रतापसिंह वरूटे यांची सलग तिसऱ्यांदा निवड*

schedule16 Dec 23 person by visibility 266 categoryउद्योग

कोल्हापूर : आवाज इंडिया

असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया या भारतातील शल्य चिकित्सकांच्या शिखर संघटनेच्या सचिव पदी कोल्हापूर सर्जिकल सोसायटी चे ऍडव्हाजरी मेंबर व डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रतापसिंह वरूटे यांची सलग तिसऱ्यांदा (वर्ष २०२४ साठी) निवड झाली आहे. 
 महाराष्ट्रातून सचिव पदी निवड होणारे ते पहिलेच सर्जन आहेत. 

मागील १३ वर्षांमध्ये त्यांनी सर्जरीच्या विविध विषयावरील अनेक परिसंवाद कार्यशाळा, थेट शस्त्रक्रिया प्रक्षेपण कार्यशाळा, वैद्यकीय शिक्षणाच्या परिषदा, अखिल महाराष्ट्र शल्यचिकित्सकांची वार्षिक परिषद २०१६, यासह कोविड काळ असूनसुद्धा २० पेक्षा जास्त ऑनलाईन प्लँटफॉर्म वर अखिल भारतीय शल्यचिकित्सकांसाठी कार्यशाळा आयोजित केल्या. याचीच पोचपावती म्हणून भारतीय शल्यचिकित्सकांनी डॉ. प्रतापसिंह वरूटे यांची महाराष्ट्रातून या पदी निवड केली. 

डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश मुदगल,कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. राकेश शर्मा, उपकुलसचिव डॉ. संजय जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, डिपार्टमेंट ऑफ सर्जरीचे विभाग प्रमुख डॉ. शीतल मुरचीटे व त्यांचे सहकारी, तसेच कोल्हापूर सर्जिकल सोसायटी चे अध्यक्ष डॉ. देवेंद्र होशिंग, सचिव डॉ. मानसिंग आडनाईक, खजानीस डॉ. सागर कुरुणकर व सर्व संचालक मंडळ तसेच कोल्हापूर सर्जिकल सोसायटी व महाराष्ट्र सर्जिकल सोसायटी चे सर्व सभासद तसेच डॉ. आप्पासाहेब मेमोरियल हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. सौ. वसुंधरा वरूटे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes