Awaj India
Register
Breaking : bolt
डी. वाय. पी. साळोखेनगर मध्ये रविवारी "सतेज मॅथ्स स्कॉलर" परीक्षेचे आयोजन*डी.वाय. पाटील च्या नव्या तंत्रज्ञानाला पेटंट चुये येथे आज पासून श्री दत्त जयंती सोहळा महापुरुषांचे विचार शालेय अभ्यासक्रमात असावेत : कौस्तुभ गावडे कर्तृत्ववान मुख्याध्यापिका सौ. सुहासिनी उदय कदम यांचा प्रेरणादायी प्रवासआदर्श व्यक्तिमत्व मुख्याध्यापक आत्माराम विश्वनाथ सोनोने धनश्री मोहिते विद्यार्थीकेंद्रित अध्यापनाची उज्ज्वल परंपरा आदर्श शिक्षक जनार्दन मधुकर कांबळे सर : विद्यार्थ्यांच्या घडवणुकीसाठी समर्पित कार्यशैलजा पाटील यांची उल्लेखनीय कामगिरी सुनंदा प्रकाश मुसळे : सेवेतून आदर्श घडवणाऱ्या शिक्षिका

जाहिरात

 

राजाराम महाविद्यालय प्रशासनाकडून न्याय मिळावा; प्रा वगरे

schedule24 Jan 25 person by visibility 799 categoryशैक्षणिक

 
कोल्हापूर
   राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर येथे अर्हतेनुसार मला विभाग प्रमुख पद देणे आवश्यक होते. विभाग प्रमुख पदापासून ते माझे पगारवाढ पर्यंत सातत्याने या महाविद्यालयात माझ्यावर अन्याय झालेला आहे, प्रशासनाने मला न्याय द्यावा, अशी मागणी प्रा. चारुता प्र. वगरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
प्रा. वगरे म्हणाल्या, पात्रता नसुनही इथे कार्यरत असणा-या नीता लाडकडे विभाग प्रमुख पद दिले. त्या अपात्र असल्या बाबत आंदोलन झाले होते. आंदोलना नंतर विभाग प्रमुख म्हणुन माझी नेमणुक करणे आवश्यक होते, परंतु Non - psychology च्या व्यक्तींकडे विभाग प्रमुख पदाचा पदभार दिला. दि. ३० एप्रिल २०२४ रोजी कांबळे सर सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून प्राचार्याकडे अतिरिक्त विभाग प्रमुख पदाचा पदभार होता. दि. ९ ऑक्टोबर २०२४ रोजी इंग्रजीचे प्रा. डॉ. देवाळलकर सर यांचे कडे मानसशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख पद दिले.
मी लोकसेवा आयोगा तर्फे निवडलेला शैक्षणिक अर्हता प्राप्त धारक असुनही मला पद दिले नाही. 
 
मला ७ वा वेतन आयोग देखील मॅट मध्ये केस दाखल केल्यानंतर जानेवारी २०२५ ला मिळाला. मला माझ्या न्याय हक्कांसाठी मॅट मध्ये केस दाखल करावी लागली. तीन वर्षे राजाराम महाविद्यालय प्रशासनाच्यास दिरंगाई मुळे ७ वा आयोगासाठी झगडावे लागले. सन २०१८ पासून माझ्या वेतनवाढ आज तागायत थकित आहे. मला यासाठी देखील मॅट मध्ये केस दाखल करावी लागली. प्रत्येक गोष्टी साठी मला संघर्ष करावा लागत असल्याचं प्राध्यापक वगरे म्हणाल्या.
 
३० नोव्हेंबर २०२३ ला महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्ष प्रा. डॉ. क्रांती पाटील यांचेकडे तक्रार केली व लेखी ४ सप्टेंबर २०२४ रोजी तक्रार दिली.
Sexual Harrasment Act 2013 नुसार कमिटी तयार नाही. त्यामुळे त्या कमिटीने दिलेला निर्णय मला मान्य नाही. माझ्या ऐकीव माहितीनुसार प्रा. डॉ. दळवी यांचे मोबाईलवर माझे बनावट अश्लील फोटो, व्हिडीओ आहेत व त्याचा वापर करुन माझी वेश्या व्यवसाय करणारी स्त्री अशी बदनामी सुरु असल्याचं वगरे यांनी सांगितलं
 
 
माझ्या तक्रारींची राजाराम महाविद्यालय प्रशासनाने नोंद घेतली नाही म्हणून मी Social Media चा आधार घेतला. मात्र राजाराम महाविद्यालय प्रशासनाने अभि व्यक्ती स्वातंत्र्यावर घाव घालत रु. ५०००/- दंड केला.
या सर्व गंभीर विषयांवर मी संघर्ष करत आहे व न्यायाची याचना करत आहे. मला न्याय मिळावा म्हणुन पत्रकार परिषदेचे आयोजन केले असल्याचे प्राध्यापक वगरे यांनी सांगितले.
 
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes