+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustमार्केट सेसच्या सुधारित जी आर चे व्यापाऱ्यांच्याकडून साखर पेढे वाटून स्वागत adjustपालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून बांधकाम कामगारावर अन्याय adjustकेंद्रीय रेल्वे व जलशक्ती राज्यमंत्री श्री. व्ही. सोमन्ना यांचा जिल्हा दौरा adjustमिशन रोजगार’ अंतर्गत रविवारी* *कॉर्पोरेट स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम* adjustकोल्हापुरातील महायुतीच्या तीन विधानसभा मतदार संघात ठिणगी adjustमहायुतीचे कोल्हापुरातील तीन विधानसभा मतदारसंघ धोक्यात adjustविशाल अनिल आवडे यांना पुरस्कार adjustउद्योगजकांशी सरंक्षण क्षेत्रातील संधीबाबत जनरल विनोद खंदारे यांचे मार्गदर्शन adjustविकास कामाच्या 'ऋतू' मध्ये निधीचा 'अमल' न झाल्याची टीका adjustशाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात विनय कोरे यांची डोकेदुखी वाढणार
schedule27 May 24 person by visibility 640 categoryशैक्षणिकशैक्षणिक

कोल्हापूर ;
ईस्पूर्ली (ता. करवीर) या केंद्रात चुये (ता.करवीर ) येथील भार्गवी भीमराव कांबळे हिने प्रथम क्रमांक मिळवला. तिने 92.40 टक्के गुण मिळवत यश संपादन केले. कोणताही क्लास न लावता तिने मिळवलेल्या यशाचं परिसरात कौतुक होत आहे. 

श्रीपतराव हरी पाटील हायस्कूल व आनंदराव पाटील जुनिअर कॉलेज चूये या ठिकाणी तिचे दहावीचे शिक्षण पूर्ण झाले. मुख्याध्यापक एस. एम. चौगुले यांच्यासह तिला सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.

दररोज चार ते पाच तास अभ्यास करत तिने यशाला गवसणी घातली आहे. आई साधना अंगणवाडीमध्ये मदतनीस तर वडील भिमराव पेंटिंगचे काम करतात.भविष्यात क्लासवन अधिकारी होणार असल्याचे स्वप्न तिने बाळगले आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी लागणारे प्रशिक्षण घेणार असून त्या दृष्टीने पुढची वाटचाल असणार असल्याचे तिने सांगितले. घरच्या परिस्थितीपेक्षा अभ्यासाची परिस्थिती लक्षात घेतल्यास यश मिळवणे कठीण नाही असेही तिने सांगितले.
यासह  वक्तृत्व स्पर्धेत सुद्धा तिने यश मिळविले आहे. लाठी-काठीसह लेझीमचे सुद्धा उत्कृष्ट प्रशिक्षण तिने घेतले आहे.


चुये हायस्कूलच्या 100%% निकाल
पंधरा वर्षे श्रीपतराव हरी पाटील हायस्कूल व आनंदराव पाटील जुनिअर कॉलेज चूये (ता.करवीर) चा निकाल शंभर टक्के लागत आहे. प्रथम क्रमांक भार्गवी भीमराव कांबळे (92.40) द्वितीय सृष्टी राजाराम धनवडे (88.20) तृतीय क्रमांक वैष्णवी उत्तम पाटील ( 87) चतुर्थ वैभवी उत्तम पाटील ( 85) मिळविला.