शाहू कॉलेजला टीमचे आजी माजी तर्फे अभिनंदन
schedule08 Aug 23 person by visibility 516 categoryलाइफस्टाइल
कोल्हापूर : आवाज इंडिया
रयत शिक्षण संस्थेच्या विचारेमाळ येथील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजला नॅकचे ए प्लस प्लस मानांकन मिळाले आहे. हे मानांकन ३.७८ सीजीपीएसह कॉलेजला मिळाले आहे. यामुळे शाहू कॉलेज हे नॅकमध्ये राज्यात अव्वल आहे. नव्या मानांकनात कॉलेजने देशात द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल आजी माजी विद्यार्थी कृती समिती,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर आणि प्रयोदी फाऊंडेशन यांच्या वतीने सर्व टिमचे डॉ.प्रविण कोडोलीकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ. एल. डी. कदम,IQAC समन्वयक प्रा.डॉ.शकील शेख,प्रा.डॉ.समाधान बनसोडे,प्रा.डॉ.करीम मुल्ला,प्रा.उमेश शेळके,प्रा.रविंद्र पाटील,अधिक्षक बाळकृष्ण शिंदे,विनायक सुतार,सचिन राणे व इतर मान्यवर उपस्थित होते.