Awaj India
Register
Breaking : bolt
*डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे* *आजपासून दोन दिवसीय ‘आर्किटेक्चर बूट कॅम्प*माहिती अधिकार नियम २०२६ विरोधात राज्यभर आंदोलनाचा इशारा१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक;* डॉ. महादेव नरके यांचे पुस्तक विद्यार्थी आणि संशोधकांसाठी दिशादर्शक – डॉ. संजय डी. पाटील*डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये* *१२ रुग्णांवर मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया*नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्याच्यावर कारवाई करा शिरोळ तालुक्यात दुधातील भेसळीचा प्रश्न गंभीर; जनता दल (सेक्युलर) तर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदनइस्पुर्ली पोलिसांची मोठी कारवाई; नंदगावमध्ये छापाडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला* *एनबीए टीएर-१ (वाशिंग्टन ॲकॉर्ड) मानांकनकोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (KMRDA) स्थापना करा; 'S4A ग्रुप'चे राजू माने यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

जाहिरात

 

*डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे* *आजपासून दोन दिवसीय ‘आर्किटेक्चर बूट कॅम्प*

schedule24 Jun 26 person by visibility 20 categoryशैक्षणिक

*डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे*
*आजपासून दोन दिवसीय ‘आर्किटेक्चर बूट कॅम्प’*

कोल्हापूर
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्यावतीने बारावी उत्तीर्ण व वास्तुकलेची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत दोन दिवसीय ‘आर्किटेक्चर बूट कॅम्प’ चे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. २४ व गुरुवार दि. २५ जून रोजी होणाऱ्या या उपक्रमात ‘डीझाईन, डीस्कव्हर, ड्रॉ’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना वास्तुकला क्षेत्रातील विविध पैलूंचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

बूट कॅम्पच्या पहिल्या दिवशी नोंदणी व स्वागत समारंभानंतर ऑगमेंटेड रिअॅलिटी (ए.आर.) व व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्ही.आर.) तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत. तसेच फेविक्रिल पेंटिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, विविध सर्जनशील उपक्रम व मार्गदर्शन सत्रेही आयोजित करण्यात आली आहेत.

दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक पन्हाळा येथे  नामवंत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली स्केचिंग कार्यशाळा तसेच फोटोग्राफी विषयक उपक्रम राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना वारसा वास्तूंचे निरीक्षण, रेखाटन आणि दृश्य सादरीकरणाचे कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे.

विविध उपक्रमांतील उत्कृष्ट सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिके व सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. वास्तुकलेविषयीची जिज्ञासा आणि सर्जनशीलता वाढविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  वास्तुकला क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे प्रमुख आर्की. इंद्रजीत जाधव यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes