Awaj India
Register
Breaking : bolt
संविधान साक्षर शाळेच्या उपक्रमातून सामाजिक परिवर्तनाचा ध्यासआदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रा. तुळशीदास हरी कांबळे यांची निवडडॉ. दत्तात्रय केरबा कांबळे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीरअंगणवाडी सेविकेच्या कार्याची उल्लेखनीय कामगिरी; ज्योती कांबळे यांचा गौरवपल्लवी गोसावी यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवडतंत्रस्नेही शिक्षक म्हणून शहाजी गायकवाड यांची उल्लेखनीय कामगिरीडॉ. हरीश भालेराव यांची ‘नॅशनल आयडियल टीचर लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड-२०२६’साठी निवडडी. वाय.पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा* *देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकार*नवीन शैक्षणिक धोरणातील कार्यभार व CHB प्राध्यापकांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्याबालकांसाठीचा पोक्सो कायदा

जाहिरात

 

इस्पुर्ली पोलिसांची मोठी कारवाई; नंदगावमध्ये छापा

schedule05 Jun 26 person by visibility 1397 categoryगुन्हे


 टाकून हजारो रुपयांचा अवैध गुटखा जप्त, एकावर गुन्हा दाखल
चुये : आवाज इंडिया प्रतिनिधी 
कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध गुटखा व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या आदेशानुसार इस्पुर्ली पोलीस ठाण्याच्या पथकाने करवीर तालुक्यातील नंदगाव येथे धडक कारवाई केली. येथील एका किराणा दुकानात सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्रीच्या ठिकाणावर छापा टाकून पोलिसांनी सुमारे १५,९०१ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एका संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरचे माननीय पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि करवीर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्री व वाहतुकीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने इस्पुर्ली पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार आपल्या हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना नंदगाव (ता. करवीर) येथील 'गणेश किराणा स्टोअर्स' या दुकानात बेकायदेशीरपणे गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांनी सदर दुकानात अचानक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी विविध कंपन्यांचा एकूण १५,९०१/- रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू आणि गुटखा जप्त केला. याप्रकरणी दुकानाचा चालक शुभम सुभाष नरके (रा. नंदगाव, ता. करवीर) या संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ सह अन्न व सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम ५९ व ६३ प्रमाणे इस्पुर्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाने केली कारवाई:
सदरची धडक कारवाई इस्पुर्ली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक नलवडे, सहाय्यक फौजदार सुरेश मेटील, पोलीस हवालदार मधुकर शिंदे, पोलीस हवालदार (बकल नंबर २०२२) जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबल अनिल पाटील यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes