Awaj India
Register
Breaking : bolt
शिक्षक पदोन्नीतीस शिक्षक समिती सदस्यांचा विरोध गोकुळ च्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समावेत आत्मक्लेश आंदोलन -डॉ. युवराज येडूरे शाळेतील मुलांवर मोबाईलचे दुष्परिणाम महिलांच्या आरोग्य आणि सोशल मीडिया सर्व वैद्यकीय पथके २४ तास कार्यरत राहतील : अध्यक्षा सौ. शिल्पाताई खोतकोचिंग क्लासेसवरील जाचक अटी कमी करा; सर्वसामान्य संचालकांना दिलासा द्या – बी. एस. पाटीलचुयेच्या सक्षम नारिंगकर याचा अटकेपार झेंडा कोल्हापूर वनविभागात फिंगर जॉईंट मशीनचालक पदासाठी भरती* जिल्हा परिषद लिपिक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी अजितबाबू मगदूम यांची निवड भावी शिक्षकांची 44 लाखांची फसवणूक

जाहिरात

 

आदिल फरास व उजळाईवाडी ग्रामस्थांमध्ये जागेवरून वाद

schedule06 Oct 23 person by visibility 1188 categoryगुन्हे


कोल्हापूर (आवाज इंडिया प्रतिनिधी)
येथील माजी नगरसेवक आदिल फरास व उजळाईवाडी (ता. करवीर) येथील ग्रामस्थांच्यामध्ये जागेवरुन वाद निर्माण झाला. हायवे लगतच्या तीन गुंठे जागेवर फरास यांनी कंपाउंड मारलं. हे कंपाउंड मारत असताना ग्रामस्थांनी विरोध केला.
त्यामुळे काही काळ ग्रामस्थ, सरपंच आणि माजी नगरसेवक फरास यांच्यामध्ये वाद निर्माण झाला.
जे.आर. कॉलनी परिसरातील संबंधित जागा ग्रामपंचायतची आहे असा दावा ग्रामस्थांनी केला.तर ही जागा खरेदी केल्याचा दावा फरास यांनी केला असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं.
या घटनेवरून गावात बैठक घेण्यात आली. याबाबत सरपंच उत्तम आंबवडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही जागा ग्रामपंचायतीची असल्याचं सांगितलं.याबाबत मोजणी सुद्धा आणणार असल्याचेही त्यांनी सांगितलं. याबाबत सोमवारी बैठक घेण्यात येणार आहे.माजी नगरसेवक फरास यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणालेही जागा पठाण यांची आहे. त्यांच्याकडून मी एग्रीमेंट केलेले आहे. पठाण कंपाऊंड आपल्या जागेत मारत होते. ग्रामस्थांनी विनाकारण वाद केला.



जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes