+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustराजारामपुरी होणार स्त्री शक्तीचा जागर* adjustयशवंतराव चव्हाण(के.एम.सी.) काॅलेज मध्ये "आपत्ती व्यवस्थापन" भित्तीपत्रकाचे आयोजन adjustपत्नीची विचारपूसही न करणाऱ्या पतीला दणका दरमहा 10 हजार रुपये पोटगी देण्याचे न्यायालयाचे आदेश adjustनिगवे खालसा येथील श्री नृसिंह सरस्वती मंदिरास २ कोटींचा निधी; मा.आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्यास यश* adjustविद्यार्थांनी भविष्यात नाविन्यपूर्ण क्षेत्रामध्ये करिअर करावे adjust*डी वाय पाटील अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्यांची* *‘इस्रो’ सेंटरमध्ये इंटर्नशिपसाठी निवड* adjustमुहम्मद असिफ खलील मुजावर यांना ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार adjustशरद गायकवाड यांना 'क्रांतीबा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक' पुरस्कार adjustकोल्हापूरला खड्डेपुर करणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात ८१ प्रभागांमध्ये आंदोलन adjustपिआरपी कोल्हापुरातील विधानसभेच्या दोन जागा लढविणार
schedule23 Jun 24 person by visibility 323 categoryशैक्षणिकशैक्षणिक


कोल्हापूर ;

कालकथित माजी खासदार एस. के. डिगे मेमोरियल फाउंडेशन कोल्हापूर (रजि) यांच्यावतीने देण्यात येणारा छत्रपती शाहू राजे समता पुरस्कार जी.आर. पाटील यांना जाहीर करण्यात आला.
रविवारी ( दि.23 ) दुपारी दोन वाजता आमदार ऋतुराज पाटील, जयवंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
पाटील यांनी आतापर्यंत कायमच विद्यार्थ्यांचे हित जोपासण्याचे काम केले. विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, कपडे वाटप, यासह विविध वृद्धाश्रम गरजू लोकांना मदत करण्याचे काम केले आहे. त्यांनी चुये, सरवडे, सावर्डे या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करत असताना विद्यार्थ्यांच्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले.
त्यांच्या सामाजिक राजकीय कारकिर्दी बद्दल आतापर्यंत त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. कोल्हापूर जिल्हा अध्यापक संघ, कोजीम प्रेरणा पुरस्कार, रस्ता सुरक्षा अभियान, रोटरी नेशन बिल्डर अवॉर्ड, अखिल भारतीय मराठी परिषद, महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघ, युवा भारत फाउंडेशन आदी संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत.