+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustसंविधानाबाबत गैरसमज पसरविणाऱ्या कॉंग्रेस प्रवृत्तीला कायमचे गाडा. " : राजेश क्षीरसागर; adjustमंडलिक, माने यांना विजयी करा ; राजर्षी शाहू महाराजांचे पणतू राजवर्धन कदमबांडे adjustप्रवक्त्याचे वटमुखत्यारपत्र जाहीर सभेत चालते, संसदेत नाही; adjustशाहू विचार दर्शन पदयात्रेत समतेचा जागर adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही : नितीन बानुगडे-पाटील adjust*डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या* *डिझाईन्सचे सोमवारपासून राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन* adjustमहालक्ष्मीनगर, मंगेशकर नगर, मंडलिक वसाहतीत काँग्रेसचा प्रचार adjustउपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांना त्यांची जागा दाखवा : आ. सतेज पाटील adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन
schedule15 Mar 24 person by visibility 71 categoryउद्योग

दूध उत्पादकांच्या जीवनात आनंद फुलविणारा गोकुळ

हिरकमहोत्सवी वर्षाचा आज सांगता समारंभ, विशेष कार्यक्रमाचे आयोजन

 

दुधाची उच्चतम गुणवत्ता आणि दर्जेदार उत्पादनं म्हणजे गोकुळ ! सहकार तत्वावर चालणाऱ्या या संस्थेने उत्तम कारभार करत लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलविला. १६ मार्च १९६३ रोजी या दूध संघाची स्थापना झाली. सहा दशकाहून अधिक कालावधीत दिमाखदार वाटचाल साऱ्यांनाच भूषणावह. दूध उत्पादकांचे हित जपत, त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा लौकिक राष्ट्रीय पातळीवर पोहोचला. गोकुळच्या हिरकमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ शनिवारी (१६ मार्च २०२४ ) होत आहे. यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हिरकमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं गोकुळच्या आतापर्यंतच्या वाटचालीवर टाकलेला दृष्टीक्षेप….

          खरं तर, हिरकमहोत्सवी वर्ष, साहजिकच कोणत्याही संस्थेसाठी गौरवास्पदबाब. ६१ वर्षांचा हा प्रवास संस्थात्मक पातळीवर अतिशय मोलाचा. गोकुळ तर कोल्हापूरशी एकरुप झालेला दूध संघ. लाखो दूध उत्पादकांच्या जीवनात आर्थिक क्रांतीच घडली. शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाई. आता मात्र दुग्ध व्यवसाय हा मुख्य व्यवसाय बनला आहे. या व्यवसायाने शेतकऱ्यांना स्वतच्या पायावर उभं केलं. महिलांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनविलं. तरुणांच्या हाताला रोजगार दिला. दर दहा दिवसाला ७० कोटीहून अधिक रक्कम दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा करणारा गोकुळ हा एकमेव दूध संघ. गोकुळची वार्षिक उलाढाल आज साडेतीन हजार कोटीहून अधिक आहे. आजपर्यंतचा गोकुळचा प्रवास हा या क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रेरणादायी आहे.

          सहकारमहर्षी आनंदराव पाटील -चुयेकर यांच्या अविरथ प्रयत्नातून आणि उदात्त दृष्टीकोनातून संघाची उत्तमरित्या जडणघडण झाली. एन. टी. सरनाईकांची साथ लाभली. १६ मार्च १९६३ रोजी संघाची स्थापना झाली. प्रारंभीच्या कालावधीत २२ संस्था आणि ७०० लिटर दूध संकलन होते. मात्र संघाचे नेतृत्व करणाऱ्या धुरिणांनी काळाची पावलं ओळखत दूध संघात आमूलाग्र बदल केले. श्वेतक्रांतीचे जनक वर्गीस कुरियन यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. संघाचा विस्तार आणि शेतकऱ्यांचा विकास हे सूत्र डोळयासमोर ठेवून धोरणं आखली. १९८५ मध्ये गोकुळ शिरगाव येथे ऑपरेशन फ्लड योजनेंतर्गत राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या (एनडीडीबी) तांत्रिक व आर्थिक सहाय्य घेऊन संघाची अद्ययावत डेअरी व पावडर प्लांटची उभारणी. संघाची सध्यस्थितीत प्रतिदिन दूध हाताळणी क्षमता १७ लाख लिटर व दूध पावडर निर्मिती इतकी आहे. कणीदार गाय व म्हैस दूध तूप, ईलायची श्रीखंड, आंबा, फ्रूट, केशर, टेबल बटर, कुकिंग बटर, दही, लस्सी, पनीर, ताक, बासुंदी, कोल्हापुरी पेढा या उत्पादनांची निर्मिती. सुगंधी दूधाची विक्री होते. टेट्रा पॅकमध्ये दूध व लस्सी, मसाले ताक याच बरोबर मार्केटमध्ये चॉकलेट, व्हेनिला, पिस्तार व स्ट्रॉबेरी या चार फ्लेअवरमध्ये सुगंधी दूध पेट जार बॉटलमध्ये उपलब्ध आहेत. तसेच गोकुळ शक्ती या नवीन टोन्ड दुध मार्केट मध्ये आणले आहे.

 

वीस लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट..

          गोकुळच्या संचालक मंडळाने वीस लाख लिटर दूध संकलनाचा उद्दिष्ठ ठेवले आहे. त्यादृष्टीने गोकुळकडून म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन योजना आखल्या आहेत. दूध उत्पादकांच्या घरापर्यंत भेटी देऊन दूध उत्पादन वाढीसाठी पाठपुरावा करत आहेत. संचालकांची त्यांना साथ लाभत आहे. भविष्याचा वेध घेत नवी मुंबई वाशी येथे नवीन दुग्ध शाळा उभारणी केली. बाजारपेठेचा अभ्यास करुन, ग्राहकांच्या आवडीनिवड जाणत नवनवीन उत्पादने बाजारात आणली. मुंबई, ठाणे, पुणे, गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चिपळूण, कुडाळ, नाशिक, सोलापूर येथे दूध विक्री. स्थानिक कोल्हापूर बाजारपेठ नजीकच्या इचलकरंजी, सांगली, मिरज, कराड, सातारा, बेळगाव, निपाणी येथे पिशवीबंद दूध इन्सुलेटेड वाहनामधून ग्राहकांपर्यंत पोहचिण्यात येते. भारतीय नौदल सेना कारवार, टी ए बटालियन गोकुळ सिलेक्ट या टेट्रा पॅक दुधाचा पुरवठा करण्यात येतो. दूध उत्पादकांसाठी ना नफा –ना तोटा या तत्वावर पशुखाद्य कारखाना चालविला जातो.


दूध उत्पादकांना डोळयासमोर ठेवून कारभार…

“दूध उत्पादक शेतकरी हा गोकुळचा कणा. दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून धोरणे आखण्यावर संचालक मंडळाचा भर आहे. गोकुळचे सत्ताधारी आघाडीचे नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दूध उत्पादकांच्या हिताचा कारभार सुरु आहे. दूध उत्पादकास खरेदीपोटी व संघामार्फत पुरविण्यात येणऱ्या सेवामधून सर्वसाधारणपणे ८२ टक्के रकमेचा परतावा दिला जातो. जनावरांना पशुवैद्यकीय सेवा पुरविल्या जातात. मादी वासरु संगोपन योजना, महिला बचत गट व कौशल्य वृद्धी कार्यक्रम, बल्क मिल्क कूलर यंत्रणामार्फत ठिकठिकाणी दूध संलकन केंद्र कार्यान्वित केले आहेत. दूध उत्पादन वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी गोकुळ श्री स्पर्धा, गोकुळ आपल्या दारी योजना, मुक्त गोठा संकल्पना राबविल्या, जनावरांचे भाकडकाळ कमी करण्यासाठी वांझ शिबिरे तसेच लसीकरण आयोजन केले जाते. दरवर्षी दूध दर फरकापोटी दिपावलीला सगळया दूध उत्पादकांना एकूण शंभर कोटीहून अधिक रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होते. जातीवंत म्हैस खरेदीसाठी केडीसी बँक व अण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्या सहकार्याने अनुदान. दुधाची गुणवत्ता सुधारण्यासाठी महालक्ष्मी संवृद्धी व मादी वासरे जन्मास यावीत व जातीवंत जनावरांच्या पैदासासाठी आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर या पद्धतीचा अवलंब केला आहे.’’ संघाचे लाखो दूध उत्पादक, ग्राहक, वितरक, दूध संस्था, संघ कर्मचारी व हितचिंतक, प्रसिद्धी माध्यम या सर्वांचे सहकार्य मिळाल्यामुळे संघाच्या हिताचे व प्रगतीचे निर्णय आम्हाला घेता आले याबद्दल धन्यवाद. सर्वांना ६१ व्या वर्धापन दिनानिमित्य हार्दिक शुभेच्छा !  

 

-अरुण डोंगळे, चेअरमन गोकुळ दूध संघ

 

 

 

· गोकुळ बद्दल थोडक्यात सन २०२२-२३

· वार्षिक उलाढाल सरासरी ३४२८ कोटी

· अधिकृत भाग भांडवल १०० कोटी

· वसूल भाग भांडवल ६१.६४ कोटी

· राखीव इतर निधी ३७०.५७ कोटी

· गुंतुवणूक २७४.७४ कोटी

· कायम मालमता २६३ कोटी

· निव्वळ नफा ९.१९ कोटी

 

संकलन

· अंतिम दूध दर फरक १०४ कोटी

· एकूण दूध संकलन ४७ कोटी ४४ लाख

· प्रतिदिनी सरासरी संकलन १५ लाख लिटर  

· प्रतिदिनी सरासरी विक्री १४ लाख लिटर