Awaj India
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये* *१२ रुग्णांवर मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया*नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्याच्यावर कारवाई करा शिरोळ तालुक्यात दुधातील भेसळीचा प्रश्न गंभीर; जनता दल (सेक्युलर) तर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदनइस्पुर्ली पोलिसांची मोठी कारवाई; नंदगावमध्ये छापाडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला* *एनबीए टीएर-१ (वाशिंग्टन ॲकॉर्ड) मानांकनकोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (KMRDA) स्थापना करा; 'S4A ग्रुप'चे राजू माने यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणीकाळमावाडी धरण दुर्घटना: प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच निष्पापांचे बळीमहिला व बालकल्याण समितीचा राखीव निधी वाढवा* समिती उपसभापती दीपा ठाणेकरांची सह पालकमंत्र्यांकडे मागणी​इस्पुर्ली पोलिसांची धडक कारवाई; निगवे खालसा येथे अवैध हातभट्टी दारू अड्डयावर छापा, तिघांवर गुन्हा दाखल​स्वप्नपूर्ती जिल्हा सहकारी गृहतारण संस्थेकडून 'शैक्षणिक कर्ज योजना' सुरू; पालकांना मोठा दिलासा

जाहिरात

 

चुये येथे बेंदूर सण उत्साहात साजरा

schedule15 Jun 25 person by visibility 884 category

केनवडे–( युवराज राजिगरे- चुयेकर)

करवीर तालुक्यातील चुये – कावणे परिसरात बेंदूर सण शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. शेतीमध्ये वर्षभर शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करणाऱ्या आपल्या लाडक्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. या निमित्ताने बैलांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

बेंदूर हा शेतकऱ्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा आणि भावनिक सण मानला जातो. आधुनिक काळात ट्रॅक्टरचा वापर वाढला असला, तरी बैलांप्रतीची ही पारंपरिक श्रद्धा आणि कृतज्ञतेची भावना आजही चुयेकरांनी जपली आहे.

सणानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा-राजाला (बैलांना) न्हाऊ-माखू घातले. त्यांच्या शिंगांना हुरमूस लावण्यात आला. अंगावर रंगीबेरंगी झुली, गळ्यात घुंगरांच्या माळा, नवीन वेसण, म्होरकी आणि कंठा घालून बैलांना सजवण्यात आले. सजवलेले बैल मिरवणूक ठिकाणी आणले गेले.

गावाच्या मुख्य मार्गावरून निघालेल्या या मिरवणुकीत शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेक ठिकाणी महिलांनी बैलांचे औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिला. मिरवणूक पाहण्यासाठी लहानथोर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मिरवणुकीनंतर शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना पुरणपोळी, कडबोळी (चकल्या) आणि इतर गोड पदार्थांचा नैवेद्य खाऊ घातला. देवघरात मातीच्या बैलांची मनोभावे पूजा करण्याची प्रथा आजही श्रद्धेने पाळली जाते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes