Awaj India
Register
Breaking : bolt
आर्किटेक्चर नंतर करिअरच्या* *अमर्याद संधी - डॉ. ए. के. गुप्ता*नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कधी भरपाई देणार**डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये* *शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर परिषद*अतिसार थांबवा अभियान’ प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी अमोल येडगे*खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण* :वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा*वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन* चुये येथे बेंदूर सण उत्साहात साजरावह्याची मदत गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, आभाळा इतकी; डॉ. राजन गवसव्हनाळी उपसरपंचपदी संजयबाबा घाटगे गटाच्या अश्विनी जांभळे यांची निवड

जाहिरात

 

वाडीपीर येथील जलजीवन मिशन; कोणी खाल्ले जास्त कमिशन

schedule12 Jun 25 person by visibility 497 categoryगुन्हे

कोल्हापुर; (प्रशांत चुयेकर)
वाडीपीर (ता. करवीर ) येथील जलजीवन मिशनची योजना काही दिवस बंद आहे. सातत्याने पाईप लाईन फुटत असल्याने गावाला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. स्वच्छ आणि मुबलक पाण्याच्या नावाखाली या योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहे. वाडीपीर येथील जल जीवन मिशन कोणी खाल्ले जास्त कमिशन असा प्रश्नही ग्रामस्थ विचारत आहेत.
 
ग्रामीण भागातील कुटुंबांना 55 लिटर पाणी देण्यात यावे. असा उद्देश या योजनेचा आहे. १५ ऑगस्ट २०१९ रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून या योजनेची घोषणा केली. २०२४ पर्यंत घरगुती नळ जोडणी (Functional Household Tap Connection - FHTC) प्रत्येक ग्रामीण घरात देणे असा उद्देशीय योजनेचा होता.
वाडीपीर या गावात 2025 पर्यंत पूर्ण काम केलेली नाही. महिन्यातून चार वेळा ही योजना बंद असते. पाणी आले तर अस्वच्छ आणि गढूळ असते. यामुळे गावातील नागरिकांना आजाराला तोंड द्यावे लागत आहे. काही महिलांनी पाण्यामध्ये अळ्या असल्याचा आरोप केला. 
ज्योती दिलीप दिंडे सांगतात,पिण्याचे पाणी विकत आणावे लागते. पाणी गढूळ असल्यामुळे लोक आजारी पडतात. आजारणामुळे व्हायरल इन्फेक्शन वाढत आहे. गावात शुद्ध पाणी मिळणे गरजेचे आहे. काही महिलांनी डेंगूचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले तर पाणी फिल्टर होत नाही असेही सांगितले.
येथील उज्वला बाबासाहेब धोत्रे म्हणाल्या, अस्वच्छ पाण्यामुळे आजाराचे प्रमाण वाढले. मुबलक पाणी येत नाही. येथील नागरिक संजय पोवार म्हणाले,ही योजना पूर्णत्वास झाली नसून याबाबत जिल्हा परिषदेकडे तक्रार केलेली आहे. दोन महिने याचा पाठपुरावा आम्ही करत आहे. अद्याप आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. विश्वास दिंडे म्हणाले, अशूद्ध पाण्यामुळे आजाराचे प्रमाण वाढत आहे.फिल्टरचे मशीन बंद असून पाणी फिल्टर केले जात नाही.
 पाडळी (ता. करवीर ) येथून सात किलोमीटरवर असणारे वाडीपीर या ठिकाणी ही जल जीवन मिशन योजना सात किलोमीटर पेक्षा अधिक अंतराने घेतलेले आहे. पाईपलाईनला वळण अधिक असल्याकारणाने पाईपलाईन गळती होत आहे.भविष्यात गळतीचा खर्च ग्रामपंचायतीला परवडणार नाही असेही ग्रामस्थांनी सांगितले.
क्रमशः
 
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes