महिला कुस्ती विजेत्यांच्या नोकरीसाठी प्रयत्न करणार पालकमंत्री दीपक केसरकर
schedule04 Jun 23 person by visibility 359 categoryक्रीडा
कोल्हापूर प्रतिनिधी
कुस्तीमध्ये प्राविण्य मिळवलेल्या महिला कुस्तीपटूंचा शासन दरबारी मान राखत त्यांच्या नोकरीसाठी प्रयत्न करणार असे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
ते भारतीय कुस्ती महासंघ आणि अस्थाई समिती महाराष्ट्र राज्यमान्यतेने व दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल
ट्रस्ट यांच्यावतीने घेण्यात आलेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती 2023 चे स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर प्रमुख उपस्थितीत होते.
क्षीरसागर यांनी सय्यद यांचे कौतुक करत कुस्ती स्पर्धेचे नेटके नियोजन केल्याबद्दल आभार मानले. तर भोसले यांनी पालकमंत्री केसरकर व क्षीरसागर यांच्या मदतीने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सोपी गेली असे सांगितले.
खुल्या गटातील विजेती महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा विजेती भाग्यश्री फड (अहमदनगर)
,वेदांतिका पवार (सातारा), 68 गटातील विजेते श्रावणी शेळके (कोल्हापूर),65 किलो गटात श्रृंकला रत्नपारखे (संभाजीनगर), 62 किलो गटात सृष्टी भोसले (कोल्हापूर),59 किलो गटात अंकिता शिंदे (कोल्हापूर), 57 किलो गटात सोनाली मंडलिक (अहमदनगर), 55 किलो गटात धनश्री फड (अहमदनगर), 53 किलो गटात स्वाती शिंदे (कोल्हापूर), 50 किलो गटात नेहा चौगुले (कोल्हापूर) या विजेतांना प्रमुख पाहुण्यांचे असते बक्षीस वितरणरण करण्यात आले. मिस्टर ओलंपिया सुहास खामकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माने.आम आदमीच्या अमरजा पाटील, पैलवान योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.