कोल्हापूर :
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आता चुरस वाढणार आहे. लहुजी संघर्ष सेनेचे लक्ष्मण तांदळे यांना वाढता पाठिंबा लक्षात घेता सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे.
लक्ष्मण तांदळे यांनी हातकणंगले लोकसभा लढविणार असा निर्धार जाहीर करताच या मतदारसंघातील माजी आमदार यांनी थेट 'आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, असं जाहीर केले आहे. राज्यातील माजी मंत्र्यांने सुद्धा नुकतच यांचं स्वागत केलं असून आमचा तुम्हाला पाठिंबा असल्याचेे सांगितले.
तांदळेंची उमेदवारी कोणाला धोका देणार याबाबत सुरुवातीपासून चर्चा होती.आता त्यांच्या वाढता पाठींबा लक्षात घेता त्यांना कसं थांबवायचं असा विचार सुद्धा सत्ताधारी करत आहे.गतवेळच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या अस्लम सय्यद यांनी सव्वा लाख पेक्षा अधिक मते घेतली होती.यामुळे राजू शेट्टी यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
तांदळे यांना यावेळी दीड लाखापेक्षा अधिक मते मिळू शकतात असा अंदाज त्यांच्या जवळच्या लोकांच्याकडून व्यक्त केला जात आहे.मातंग समाजाची टक्केवारी लक्षात घेता मागासवर्गीय उमेदवार म्हणून त्यांना ओबीसी यांची मते अधिक पडणार आहेत. त्यामुळे बेरजेच्या राजकारणात तांदळे खासदार झाले तरी आश्चर्य वाटू नये.