सत्यशोधक महात्मा फुले यांचे क्रांतिकारी विचार समजून घेणे गरजेचे : डॉ. राजेखान शानेदिवाण
schedule29 Nov 23 person by visibility 342 categoryसामाजिक
कोल्हापूर (प्रतिनिधी) : महात्मा ज्योतिराव फुले हे भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान आहेत. त्यांनी ज्या बहुजन समाजासाठी संघर्ष उभा केला तो ऐतिहासिक आहे. त्यामुळे सत्यशोधक महात्मा फुले यांचे क्रांतिकारी विचार समजून घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डॉ. राजेखान शानेदिवाण यांनी केले.
ते बालसाहित्य कलामंचचे बाल साहित्यिक आदित्य म्हमाने, कनिष्का खोबरे, अमिरत्न मिणचेकर, तक्ष उराडे, स्वरा सामंत, पल्लव गायकवाड, पृथ्वीराज वायदंडे, आतिफ काझी, पृथ्वीराज बाबर यांनी लिहिलेल्या सत्यशोधक महात्मा या महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवन, विचार व कार्याचा आढावा घेणाऱ्या राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी झालेल्या पुस्तक प्रकाशन समारंभ प्रसंगी बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकरी चळवळीचे नेते प्रा. शहाजी कांबळे, कवयित्री डॉ. स्मिता गिरी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. नंदकुमार गोंधळी, प्रा. किसनराव कुराडे, लेखिका छाया पाटील, ॲड. करुणा विमल, रघुनाथ ढोक, डॉ. श्रीपाद देसाई, महेश्वर तेटांबे, सनी गोंधळी, रूपाताई वायदंडे, सतीश माळगे, व शिक्षक नेते दत्तात्रय गायकवाड उपस्थित होते.
यावेळी सत्यशोधक प्रागतिक मंच आणि निर्मिती फिल्म क्लब यांच्यावतीने सत्यशोधक राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन प्रा. डॉ. अमर कांबळे, रंजना सानप, प्रा. डॉ. स्मिता गिरी, डॉ. खंडेराव शिंदे, मोहन मिणचेकर, दत्तात्रय गायकवाड, अमित मेधावी, मिणचे, लक्ष्मण माळी, अजय काळे, अमित पंडित, प्रा. अमोल वाघमारे, शंकर पुजारी, जगन्नाथ लोहार, संभाजी मदने, नुतन परीट यांचा तर महात्मा फुले विचार प्रेरणा पुरस्कार देऊन प्रा. टी. के सरगर, लक्ष्मण माळी, साधना पाटील, काळुराम लांडगे, कृष्णा शेलार, मुकुंद आव्हाड, डॉ. देवेंद्र रासकर, डॉ. वैशाली वाघमोडे-शेडगे, सुरेश हिवराळे, संतोष धुरंधर, प्रा. डॉ. निलकुमार शिंदीकर, सदाशिव बागडे यांचा सन्मानचिन्ह आणि पाच हजार रुपयांची पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.
स्वागत डॉ. शोभा चाळके, प्रास्ताविक अनिल म्हमाने, सूत्रसंचालन डॉ. दयानंद ठाणेकर यांनी केले. आभार अरहंत मिणचेकर यांनी मानले.