प्रा. जितेंद्र भारमगोंडा यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
schedule01 Apr 25 person by visibility 227 categoryशैक्षणिक

कोल्हापूर;
कृती फाउंडेशन कोल्हापूर यांच्यावतीने विवेकानंद महाविद्यालय, ज्युनिअर कॉलेजचे प्रा. जितेंद्र रावसो भारमगोंडा यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला. रविवारी (दि.6 एप्रिल) शाहू स्मारक भवन कोल्हापूर, येथे साडेचार वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
प्रा. भारमगोंडा हे 25 वर्षा पासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.10 वी व 12 वी नंतर संधी यासाठी विशेष मार्गदर्शन,11 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अडचणीसोबत व्यक्तिगत अडचणींसाठी मार्गदर्शन, एनसीसी चे 8 वर्ष मार्गदर्शन एनसीसीतून अनेक विद्यार्थी भरती आणि ऑफिसर होण्यासाठी विशेष मार्गदर्शन त्यांनी केले आहे.
विविध सामाजिक संस्थाना मदत, कोरोना काळात लोकांना मदत, पूर काळात लोकांना वाचवायला तसेच अन्न पुरवठा, अनेक रॅली तून सामाजिक जाणीव करून देणे, पंचगंगा नदी स्वच्छता प्रयत्न,दरवर्षी रक्तदान आधी सामाजिक क्षेत्रात त्यांनी कार्य केले आहे. साहित्याची त्यांना आवड असून त्यांचे विविध लेख प्रसिद्ध झालेले आहेत तर कविता सुद्धा लिहिण्याचा त्यांना छंद आहे. त्यांच्या शैक्षणिक सामाजिक साहित्यिक कार्याचा आढावा घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.