Awaj India
Register
Breaking : bolt
शाळेतील मुलांचा आहार असा असावा बबनराव शिंदे यांना 'लोकराजा शाहू कोल्हापूर भूषण पुरस्कार' प्रदानऐतिहासिक माणगाव जिल्हा परिषद शाळेला कोल्हापूर जि.प. पदाधिकाऱ्यांची भेटकळंब्याचा कायापालट; विविध विकासकामांचे थाटात भूमीपूजन! एक कॉल, प्रॉब्लेम सॉल' प्रतिमेमुळे बाबा नांदेकर ठरताहेत जनतेचे आधारस्तंभकोल्हापुरात उद्या 'पशुधनातील संतुलित आहार व वैरण पीक लागवड' तांत्रिक कार्यशाळा शिक्षक पदोन्नीतीस शिक्षक समिती सदस्यांचा विरोध गोकुळ च्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समावेत आत्मक्लेश आंदोलन -डॉ. युवराज येडूरे शाळेतील मुलांवर मोबाईलचे दुष्परिणाम महिलांच्या आरोग्य आणि सोशल मीडिया

जाहिरात

 

कोल्हापुरात “कॉकरोच जनता पार्टी”ला महाराष्ट्र बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा; २९ मे रोजी मेळावा

schedule27 May 26 person by visibility 222 categoryराजकीय

कोल्हापूर :आवाज इंडिया प्रतिनिधी 
राज्यातील बहुजन समाजातील बेरोजगार व अन्यायग्रस्त तरुणांनी ऑनलाइन माध्यमातून स्थापन केलेल्या “कॉकरोच जनता पार्टी” या नव्या संघटनेला महाराष्ट्र बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शुक्रवार दि. २९ मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजता दसरा चौक, कोल्हापूर येथे एकत्र मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात . महाराष्ट्र बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल माने, उपाध्यक्ष प्रमोद हुपरिकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या कार्यक्रमात समाजातील विविध घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. “बहुजनांचा आवाज बदलाचा साज” या घोषवाक्यासह सामाजिक व राजकीय परिवर्तनाचा संदेश देण्याचा प्रयत्न या मेळाव्यातून करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास राजेंद्र कांबळे, प्रकाश हूल्लस्वार, सुरेश जत्राटकर, प्रा. सुहास निर्मळे, युवराज राजवाडे, किरण परवर्धन, सुरेश मालोकर, अमित कांबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes