Awaj India
Register
Breaking : bolt
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे कार्य* *सामान्य माणसाला दिलासा देणारे*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शाहू समाधीचे दर्शन*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते 1850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन*घटता जन्मदर, वाढते वंध्यत्व आणि बदलती लोकसंख्या रचना यावर विचार होणे आवश्यक सीपीआर खोकीधारकांची पुनर्वसन करण्याची मागणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेचा मार्ग मोकळालवकरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीजथोरला दवाखाना गोरगरिबांची आरोग्यदायीनी तर केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर शहराची अस्मिता*विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून कोल्हापुरात एनडीए परीक्षेचे केंद्र सुरू करावे* डॉ. डी. वाय. पाटील यांनी गुणवत्तेची संस्कृती निर्माण केली

जाहिरात

 

अन्यथा आम्ही आत्मदहन करू

schedule12 Dec 20 person by visibility 3867 categoryलाइफस्टाइल

 


म्हाळुंगे येथील लघुउद्योजकांना इशारा

कोल्हापूर

म्हाळुंगे तालुका करवीर येथील 

लघुउद्योजकांचा व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचा कुटील डाव ग्रामपंचायतीने आखला आहे. मंगळवार(दिनांक 15) पर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी बारा वाजता आम्ही आत्मदहन करणार आहोत, असा इशारा लघु उद्योजकांनी केला. याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

रस्ता मोठा असतानासुद्धा आम्हा लघुउद्योजकांना हटवून ग्रामपंचायत प्रशासन काय सुशोभीकरण करणार आहे सुशोभीकरण करायचं असेल तर आमचं थडगं बांधून सुशोभिकरण करा असे आवाहन लघु उद्योजकांनी केले.

तीस वर्ष व्यावसायिक कर आम्ही भरत आहोत गेल्या तीन वर्षापासून आमच्या व्यावसायिक कर घेतलेला नाही सुशोभीकरणाच्या नावाखाली आमचे त्याच ठिकाणी मागे सरकून पुनर्वसन केले. आत्ता पुन्हा आम्हाला तेथून हटवण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. 

आम्हाला दिलेल्या नोटीसा मागे घ्याव्यात, आम्हाला व्यवसाय करण्यासाठी व्यवसायिक कर भरून घ्यावा,आम्हाला न्याय मिळावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आम्हाला न्याय मिळाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आत्मदहन करणार आहोत, असा इशाराही लघु उद्योजक यांनीदिला 


यावेळी सजन चौगुले, सुकुमार शेंडूरे ,अजित मोरे, संभाजी पाटील, धनाजी पाटील,, शिवाजी मोरे, रेखा मोरे, नारायण मोरे, आबासो मोरे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes