पिआरपी कोल्हापुरातील विधानसभेच्या दोन जागा लढविणार
schedule25 Aug 24 person by visibility 225 category
कोल्हापूर:
आगामी विधानसभा निवडणुकीत पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महायुतीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या दोन जागा लढविण्यात येणार असून यामध्ये हातकणंगले विधानसभा आणि उर्वरीत नऊ पैकी एका मतदार संघात पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. नंदकुमार गोंधळी यांनी दिली.
पीपल्स रिपब्लिकन पार्टी महायुतीचा घटक पक्ष असून मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर पक्षाची युती आहे. या युतीच्या माध्यमातून हातकणंगले या राखीव मतदारसंघाच्या जागेची आग्रक्रमाने मागणी करून ही जागा युतीतून लढविण्या संदर्भात प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकुमार गोंधळी यांच्या अध्यक्षतेखाली पेठवडगाव येथे झालेल्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्धार करण्यात आला आहे. या बरोबरच जिल्ह्यातील आणखी एका जागेची मागणी करण्यात येणार आहे.
पीपल्स रिपब्लिकन पक्षाची उच्चअधिकार कोर कमिटीची बैठक ठाणे जेऊर येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गणेश उणबने यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे व कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली १४-१५ जूनला संपन्न झाली. या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत राज्यातील विधानसभेच्या ३१ जागा लढविण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातून दोन विधानसभेच्या जागेवर निवडणूका लढविण्यासंदर्भात जिल्ह्यातील पदाधिकाऱ्याच्या झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे
या संदर्भात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे व कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे यांनी अनुकुलता दर्शवली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणुक ताकदीने लढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ नंदकुमार गोंधळी म्हणाले, पीपल्स रिपब्लिकन पक्षाची नाम. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर गेल्या दोन वर्षापासून युती आहे. परंतू अद्याप पीआरपीला सत्तेत कोणताही बाटा मिळालेला नाही. त्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याची दखल घेवून पीआरपीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांना विधानपरिषदेवर संधी देवून मंत्रीमंडळात सहभागी करून घ्यावे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघ राखीव असल्याने हा मतदारसंघ महायुतीने पीपल्स रिपब्लिकन पक्षाला सोडावा लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाने महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे त्यामुळे अग्रहक्काने या जागेवर आमचा अधिकार आहे. ही जागा युतीतून मिळाल्यास आम्ही ती जिंकून आणू. आमच्या पक्षाकडे सक्षम उमेदवार आहे.
याबरोबरच १ ऑगस्ट साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनापासून राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या हस्ते पक्षाच्या सदस्यता अभियानाची सुरूवात करणेत आली असून कोल्हापूर जिल्ह्यात सदस्यता अभियान राबविणेत येत आहे.
यावेळी हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष विद्याधर कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे, हातकणंगले तालुकाध्यक्ष सुरेश सावर्डेकर, रमाई महिला ब्रिगेड जिल्हाध्यक्षा सौ लताताई नागांवकर, जिल्हा उपाध्यक्ष रतन कांबळे, रिपब्लिकन युथ फोर्स करवीर तालुकाध्यक्ष जितेंद्र कांबळे, रमाई महिला ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्षा रेखा कांबळे, रमाई महिला ब्रिगेड करवीर तालुकाध्यक्षा माधुरी कांबळे, राकेश चौगुले, बाळासाहेब कांबळे, रविंद्र कांबळे, गौतम कांबळे, दिनकर कांबळे, भारत सोरटे आदी उपस्थित होते.