Awaj India
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या ४९ विद्यार्थ्यांची निवडचळवळ टिकण्यासाठी एकत्र येणे गरजेचे ; उत्तम कांबळेअण्णा ब्रिगेडचे संस्थापक डॉ.अमोल महापुरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा*पंचगंगा प्रदूषण प्रश्न उद्योजकांची बैठक घेऊन प्रश्न सोडवणार : आबिटकरनदी प्रदूषण प्रश्नी प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा : माणगावेडॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयाच्या* *दोन माजी विद्यार्थ्यांची अन्न व प्रशासन विभागात निवड*डी. वाय पाटील कृषी विद्यापीठाच्या* *13 विद्यार्थ्यांची डी - मार्टमध्ये निवड*डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक टाटा मोटर्स पुणे यांच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न*शिलेदार हायकर्स फाउंडेशनतर्फे मोफत शालेय बँगचे वाटपनदी प्रदूषित करणाऱ्यांच्यावर कारवाई करावी

जाहिरात

 

गोड साखर निवडणुकीत भाजपचे दोन अपक्ष उमेदवार

schedule30 Oct 22 person by visibility 975 categoryराजकीय


आवाज इंडिया प्रतिनिधी

गडहिंग्लज:-(महेश भादवणकर) आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका शेतकरी साखर कारखाना लि. हरळी ची २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. मतदान रविवारी (६ नोव्हेंबर) होत असून, अनपेक्षित धक्कादायक आघाड्या निर्माण झाल्या. 
 राष्ट्रवादीच्या दोन आमदार एकमेकां विरुद्ध उभे ठाकल्याने ह्या निवडणुकीला अधिक महत्त्व आले आहे. या मध्ये दोन पॅनेल तयार करण्यात आले आणि दोन्ही पॅनेल मध्ये सर्वपक्षीय उमेदवार पाहण्यास मिळत आहेत.
भाजपा गडहिंग्लज शहर अध्यक्ष राजेंद्र तारळे यांनी गडहिंग्लज- हनिमनाळ आणि भाजपचे प्रीतम कापशे यांनी नुल- नरेवाडी मधून अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. त्यांनी सुरवातीला कोणत्याही पॅनेल सोबत न जाता अपक्ष राहन पसंत केले मात्र नंतर श्री. काळभैरव शेतकरी, कामगार विकास आघाडी या पॅनेला पाठिंबा दिला मात्र त्यांनी आपल्या दोन जागा लढवण्याचा निर्धार पक्का करून प्रचार सुरू केला. 
राजेंद्र तारळे गडहिंग्लज अर्बन बँकेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक त्याच बरोबर भाजपाचे शहर अध्यक्ष असल्याने त्यांचा तालुक्यातील जनतेशी जनसंपर्क चांगला आहे, त्याच बरोबर भाजपचे राज्यात सरकार असताना जनतेची केलेली कामे पाहता ते विजयाचे प्रबळ दावेदार असल्याचे मानलं जातं आहे. त्याच बरोबर प्रीतम कापशे यांनी गेल्या काही वर्षांत स्थानिक प्रश्न प्रामुख्याने उचलून धरल्याने त्यांच्या नावाची सुद्धा चर्चा जोरदार होताना दिसत आहे.  
दोन मोठ्या पॅनेल समोर हे 2 दोन अपक्ष उमेदवार टक्कर देणार हे सिद्ध झाले आहे. 
यावेळी तारळे यानी आवाज इंडियाशी बोलताना सांगितले की, कारखाना पुन्हा नव्या जोमाने सुरू करून अनेक वर्षे रखडलेला कामगारांचा प्रश्न आम्ही मार्गी लावू, त्याच बरोबर राज्यात आमचे सरकार असल्याने आम्ही सरकार कडून लागेल ती वेळोवेळी मदत घेऊन पुन्हा नव्या दिमाखात कारखाना चालवून दाखवू. भाजप जिल्हाध्यक्ष समरजीसिंह घाटगे यांनी आपला कारखाना सातत्याने एक नंबर वर ठेवला त्याच प्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सुद्धा कायम प्रयत्न करू. ऊस उत्पादक शेतकरी आणि संस्था यांचा आपला संपर्क चांगला असून त्यांनी आम्हाला पाठबळ देण्याचा शब्द दिला आहे त्या जोरावर "अंगठी" या चिन्हावर आमच्या दोन्ही अपक्ष जागा निवडणूक आणू असा विश्वास त्यानी व्यक्त केला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes