कचरावेचक महिलांना कचरा वर्गीकरणाचा ठेका दयावा ; वसुधा संस्थेची मागणी*
schedule05 Jan 24 person by visibility 245 categoryसामाजिक
*प्रेसनोट*
दि ४/१२४
--------------------
*
-------------------
वसुधा संस्था ही कचरावेचक महिलांसाठी कार्य करणारी संघटना आहे. संघटनेमार्फत गेल्या ५ वर्षापासून कोल्हापूर शहरामध्ये कचरावेचकांचे संघटन केले जात असून शहरातील कचरा व्यवस्थापनावर गेल्या ५ वर्षापासून संस्था अविरतपणे कार्यरत आहे. वसुधा हि संघटना कचरावेचक महिलांनी स्थापन केली असुन संस्थेचे ध्येय कचरावेचक महिलांचे जीवनमान सुधारणे, गरजू, आर्थिकदृष्ट्या मागास, निराधार महिलांचा सर्वांगीण विकास करणे हे आहे. एक कार्यक्षम, जबाबदार आणि उत्तरदायी संस्था म्हणून कचरावेचक महिलांच्या मदतीने पर्यावरणाचे रक्षण करणे आणि त्यांना स्वावलंबनातून आत्मनिर्भर बनविणे हे संस्थेचे उद्दिष्ट्च आहे.
दिनांक 29 डिसेंबर दैनिक पुढारी मधील वृत्तपत्रानुसार कोल्हापुर महानगरपालिकेने एका खाजगी कंपनीला कच-याचा ठेका दिला आहे. अनेक वर्षे कचरावेचक फिरुन कचरा गोळा करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्याचा पर्यावरण रक्षणासाठी खुप फायदा होत आहे. 8 एप्रिल 2016 च्या घनकचरा व्यवस्थापन कायदयानुसार कचरा वेचकांना कचरा वर्गीकरणाच्या कामात सामावुन घेण्याचे नमुद केले असुन अदयाप कचरावेचकांना कचरा वर्गाकरणाच्या कामात सामावुन घेण्यात आलेले नाही. कोल्हापूर जिल्ह्यात याची मागणी खुप वेळा होऊन सुद्धा अमंबजावणी झालेली नाही.
*तरी खालील मागण्याचा सहानुभुतीपुर्वक विचार करावा.*
1) 8 एप्रिल 2016 च्या सेक्शन 11 व 15 नुसार कचरावेचक महिलांच्या हाताला काम देऊन सहकार्य करावे.
2) कचरा वर्गीकरणाचा ठेका कचरावेचकांच्या बचतगटांना नेमून देण्यात यावे. 10. शहरात वॉर्डनुसार कचरा वर्गीकरण केंद्र स्थापन करून कचरावेचकांच्या बचतगटांना हे केंद्र चालविण्याची संधी द्यावी.
3) ई-कचरा संकलन केंद्र स्थापन करून कचरावेचकांच्या बचतगटांना हे केंद्र चालविण्याची संधी द्यावी.
4) शहरात विभागानुसार प्लास्टिक कलेक्शन सेंटर निर्माण करावेत.
5) प्लास्टिक कलेक्शन सेंटरचे नियोजन व वर्गीकरणाचे काम कचरावेचकांना द्यावे.
6) वसुधा संस्थेअर्तगत कचरावेचकांना ओळखपत्र देण्यात यावे. कोल्हापूर शहरातील स्वच्छेतेच्या कामात कचरावेचकांना सामावून घेतले तर, शहराचा कचरा प्रश्न शास्त्रोक्त पद्धतीने सुटेल.
सदर मागण्यांचे निवेदन मा. आयुक्त मंजूलक्ष्मी यांना देण्यात आले आक्काताई गोसावी, भारती कोळी, संगिता लाखे, राजश्री नाईक, संगिता लोढे, सविता कांबळे, लक्ष्मी कांबळे वनिता कांबळे,साताऱ्यात मोहिते उपस्थित होते.