Awaj India
Register
Breaking : bolt
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मितादेवी जाधव यांच्या नावाची चर्चा; शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेत संधी द्यावी.भविष्यात गोकुळ दूध संघाचा कारभार परप्रांतीय अमूलवर अवलंबून राहता कामा नये संचमान्यतेस 10 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ द्या : राजेंद्र कोरेकोल्हापुरात रविवारी जीप (4X4) ऑफ रोडिंगचा थरार दिव्यांग खेळाडूंना पॅरा पिकलबॉलसाठी मोफत कोर्ट स्पोर्ट्स सेंटर कोल्हापूरचा कौतुकास्पद उपक्रमडी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या* *विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअप*आदिवासींवरील क्षेत्रीय बंधन कायद्याला ५० वर्षे; सामाजिक, शैक्षणिक व राजकीय विषमतेचा प्रश्न कायममंगेश चिवटे यांना राजर्षी शाहू विकास आघाडीची उमेदवारी देऊ आणि त्यांना ताकदीने निवडून आणू* शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांचा संघर्ष; १८ मागण्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध

जाहिरात

 

वृक्षतोड करणाऱ्याच्यांवर कारवाई करावी

schedule16 May 21 person by visibility 12945 categoryगुन्हे

कोल्हापूर

    मौजे ऐनी (ता.राधानगरी) येथील रहदारीचा सार्वजनिक डांबरीकरण रस्त्याच्या दूतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली आहे. फांद्या तोडायची परवानगी असताना वृक्ष पुर्ण तोडले बद्दल कारवाई करावी अशी मागणी स्वरा वेल्फेअर फौंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.


सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून 33 कोटी वृक्ष लागवड या कार्यक्रमातून वृक्षारोपण केले होते.

   तलेवाडी कॅनॉल पूल ते मौजे ऐणी येथे वनक्षेत्र वनअधिकारी राधानगरी विभाग यांच्यामार्फत 88 वेगवेगळ्या झाडांच्या फांद्या तोडण्यास परवानगी दिली होती.संबधित ठेकेदाराने फांद्या तोडण्याऐवजी 80 ते 90 झाडे संपूर्ण मुळापासून तोडली आहेत.

वृक्ष तोड झालेल्या ग्रामस्थां, आझाद हिंद तरुण मंडळाच्या कार्यकर्ते आर. डी. शिंदे, बाबासाहेब कांबळे यांनी कामगार तलाठी याना दोषींवर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले होते. तरी आद्यप कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून आले. या गोष्टीचा पूर्ण छडा लागून मुख्य सुत्रधारापासून शेवटच्या कामगारां पर्यंत चौकशी व्हावी. दोषींवर कार्यवाही अशी मागणी अध्यक्षप्रमोद जनार्दन माजगावकर यांनी निवेदनातून केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes